अंडी चोरणारा शिपाई निलंबित; चोरीचा व्हिडीओ व्हायरल

Punjab Policemen Suspended - Maharashtra Today

पंजाब येथे अंडी चोरणारा पोलीस शिपाई निलंबित झाला आहे. तो चोरी करतानाचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर अधिकाऱ्यांनी त्याला निलंबित केले. घटना अशी – पंजाबमध्ये अंडी भरून नेणारा कटलेवाला कटला रस्त्याच्या कडेला उभा करून काही कामासाठी गेला. कटल्याजवळ कोणीही नाही हे पाहून फतेगड साहिब पोलीस ठाण्यातील प्रीतपाल सिंग हा पोलीस शिपाई कटल्याजवळ आला आणि कोणी आपल्याला पाहात नाही याचा अंदाज घेऊन दोन वेळा ट्रेमधली दोन–दोन अंडी खिशात टाकली. प्रीतपालच्या नकळत कुणी तरी याचा मोबाईलमध्ये व्हिडीओ शूट केला आणि सोशल मीडियावर व्हायरल केला.

हा व्हिडीओ पाहिल्यानंतर नेटीजन्सने संताप व्यक्त केला व हा व्हिडिओ शेअर करण्यास सुरुवात केली. अनेकांनी पोलिसाच्या या चोरीचा निषेध करत कडक कारवाई करण्याची मागणी केली. पोलीस अधिकाऱ्यांनी हा व्हिडीओ पाहिल्यानंतर प्रीतपालला निलंबित केले व या घटनेच्या चौकशीचे आदेश दिलेत. पंजाब पोलिसांनी ट्विटरवर ही माहिती दिली आहे.

Disclaimer:-बातमीत एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. महाराष्ट्र टुडेच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व महाराष्ट्र टुडे स्वीकारत नाही.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button