
भजी म्हटलं तर आपल्याला कांद्याची भजी, बटाट्याची भजी आणि मिरची ची भजी अशे प्रकार माहिती आहेत. परंतु आज आम्ही तुमच्यासाठी पौष्टिक भजीचा प्रकार आणलं आहे. ते म्हणजे अंड्याची भजी. आता अंडा हे शरीरासाठी पौष्टिक असतो हे आपल्या सर्वांना माहिती आहे. त्यात भजी हे सर्वांनाच आवडणारा पदार्थ. शिवाय बनवायला अगदी सोप्पे. मघ होऊन जाऊ द्या ही अंड्याची भजी..लिहा रेसिपी..
साहित्य :-
- ४-५ उकडलेले अंडे
- बेसन
- बारीक चिरलेले कांदे
- चिरलेली हिरवी मिरची
- आल-लसून पेस्ट
- लाल तिखट
- मीठ
- कोथिंबीर
- तेल
कृती :- सर्वात आधी एका भांड्यामध्ये बेसन, कांदे, हिरवी मिरची, आल-लसून पेस्ट, लाल तिखट, मीठ आणि कोथिंबीर या सर्व पदार्थांना एकजीव करून घ्यावे. नंतर गरम तेलाचा मोहन या मिश्रणावर घालावे. आता उकडलेली अंड्यांना उभ्या दिशेने कापून घ्यावे. मघ मिश्रणामध्ये बुडवून त्याला तेलामध्ये फ्राय करून घ्यावे. नंतर वरून चाट मसाला टाकून गरमागरम सर्व्ह करावे.
ही बातमी पण वाचा : या ख्रिसमसला बनवा ‘स्पेशल रेड वेलवेट केक’