मराठा समाजला तात्काळ आरक्षण देण्यात यावे : एकनाथ खडसे

बीड: राज्यभरात सध्या मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी आक्रमक मोर्चा सुरु आहे. यातच आजपासून महाराष्ट्र बंद देखील करण्यात आले आहे. त्यामुळे सद्यपरिस्थिती पाहता मराठा समाजाला तात्काळ आरक्षण देण्यात यावे, असे मत माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी व्यक्त केलं आहे.

पंढरपूरहून विठ्ठल-रुक्मणीचे दर्शन घेऊन परत येत असतांना बीडमधल्या आष्टीमध्ये त्यांनी खडसे यांनी हे मत मांडलं. पंढरपूरहून येत असतांना औरंगाबादच्या कायगाव टोका इथे मराठा कार्यकर्त्यांनी रास्ता रोको सुरू आहे. त्यामुळे त्यांना मार्ग बदलावा लागला. आष्टी पाथर्डी शेवगाव पैठण मार्गे ते औरंगाबादेत दाखल झाले.

मराठा समाजाच्या आरक्षणाबाबतचा निर्णय न्यायालयात प्रलंबित आहे. मात्र, तरी मागासवर्गीय आयोगाचा अहवाल आणि न्यायालयाच्या निर्णयाला अधिन राहून तात्काळ मराठा समाजाला आरक्षण दिले जावे, असे खडसे म्हणाले.