हॉस्पिटॅलिटी क्षेत्रासाठी परवान्यांची संख्या कमी करून ‘ईझ ऑफ डुइंग’ बिझिनेसची प्रभावी अंमलबजावणी करणार

Hospitality-Mantralay

मुंबई : मंत्रिमंडळाच्या आजच्या बैठकीत अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्यात आलेत. त्यापैकी हॉस्पिटॅलिटी क्षेत्रासाठी (hospitality sector) ( आदरातिथ्य) परवान्यांची संख्या कमी करून ईझ ऑफ डुइंग बिझिनेसची (Ease of Doing) प्रभावी अंमलबजावणी करण्यात येणार, असा आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय झाला.

तसेच, ग्रामीण भागातील लाखो कुटुंबीयांना दारिद्र्य रेषेवर आणणाऱ्या नव तेजस्विनी-महाराष्ट्र ग्रामीण महिला उद्यम विकास प्रकल्पाला गती देणार, असा महत्त्वपूर्ण निर्णय आजच्या बैठकीत झाला आहे. यासाठी ५२३ कोटी रुपये निधी उभारण्यात येणार आहे. आंतरराष्ट्रीय कृषी विकास निधीमार्फत साहाय्य करणार.

तसेच, महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ, नाशिक येथे कुलगुरू व प्र-कुलगुरू या वैधानिक पदावर नियुक्त अधिकाऱ्यांना विद्यापीठ अनुदान आयोगाच्या धर्तीवर सातव्या वेतन आयोगाची वेतनश्रेणी लागू करण्याचा निर्णयदेखील आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत झाला.

कृषिपंप शेतकऱ्यांना दिलासा देणारी उच्चदाब वितरण प्रणाली योजना (HVDS) राबविण्यासाठी एशिएन डेव्हलपमेंट बँकेकडून कर्ज घेण्याचा निर्णय आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER