शिक्षण विद्यार्थी केंद्रितच असावे’

राष्ट्रपतींनी आयोजित केलेल्या नव्या शैक्षणिक धोरण विषयक राज्यपाल परिषदेत राज्यपाल कोश्यारी यांचे प्रतिपादन

Bhagat Singh Koshyari

नव्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी करताना शिक्षण ‘शिक्षक केंद्रित’ न राहता ते ‘विद्यार्थी केंद्रित’ व्हावे, तसेच धोरण प्रत्यक्षात आणताना लहान समित्यांच्या माध्यमातून सूक्ष्म व्यवस्थापनावर भर द्यावा, असे आग्रही प्रतिपादन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (Bhagat Singh Koshyari) यांनी आज केले.

‘राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या माध्यमातून उच्च शिक्षणात परिवर्तन’ या विषयावर राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी आयोजित केलेल्या राज्यपाल परिषदेतील चर्चासत्रामध्ये राजभवन, मुंबई येथून सहभागी होतांना राज्यपालांनी वरील प्रतिपादन केले. डॉ. कस्तुरीरंगन यांच्या अध्यक्षतेखालील समितीने तयार केलेले नवे राष्ट्रीय शैक्षणिक धोरण पथदर्शी आहे. शैक्षणिक धोरणाला कृतीमध्ये उतरवताना सदाचार व संस्कारावर भर द्यावा लागेल असे राज्यपालांनी सांगितले.

शिक्षण केवळ रोजगाराभिमुख न राहता ते चारित्र्य संपन्न विद्यार्थी घडविणारे असावे असे राज्यपालांनी यावेळी सांगितले. चर्चासत्राला/मानव संसाधन विकास मंत्री रमेश पोखरीयाल ‘निशंक’, राज्यमंत्री संजय धोत्रे, राष्ट्रीय शैक्षणिक धोरण समितीचे अध्यक्ष के. कस्तुरीरंगन आदी उपस्थित होते.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER