
मुंबई : इडीचे ऑफिस सध्या मोदींच्या घरातून काम करत आहे. हातातल्या बाहुलीप्रमाणे इडीला नाचवलं जात आहे. स्वतंत्रपूर्व काळातदेखील इतका अतिरेक झाला नव्हता. त्यामुळे ईडीचे अधिकारी मोदींचे गुलाम की घटनेला मानणारे अधिकारी ? अशा शब्दात राज्यमंत्री बच्चू कडू (Bacchu Kadu) यांनी मोदींवर (PM Narendra Modi) टीका केली आहे. खरंतर, गेल्या काही दिवसांपासून अनेक राजकीय नेत्यांवर ईडीच्या कारवाया होत असल्याचं समोर येत आहे. हल्लीच शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या पत्नीला ईडीकडून नोटीस पाठवण्यात आली. यावर बच्चू कडू यांनी भाजप सरकारवर टीका केली आहे.
टीव्ही 9 मराठीला दिलेल्या विशेष मुलाखतीत कडू यांनी भाजप नेत्यांवर टीकास्त्र सोडले. भाजपचे लोकप्रतिनिधी गंगास्नान करून आले आहेत का? त्यांच्यावर कारवाई का केली जात नाही? ‘ईडीच्या प्रमुखांना काही इमानी इभ्रत काही जिवंत असेल आणि भारताचे नागरिक असाल तर त्यांनी सांगा की ते मोदीचे गुलाम आहेत की भारतीय घटनेचे अधिकारी आहेत? एका तरी भाजपच्या नेत्यावर, आमदारांवर चौकशी झाली असेल असे एखादे उदाहरण सापडलं नाही. हे सर्व गंगास्नान करून आलेत का? याच्या आधी स्वातंत्र्यपूर्व काळामध्येदेखील इतका अतिरेक झाला नाही याचा दुष्परिणाम सरकारला भोगावा लागेल’ असा इशाराही बच्चू कडू यांनी दिला आहे.
दरम्यान, ज्या पद्धतीने सगळं सुरू आहे हे चालूच राहणार. मात्र, याचा परिणाम कुठे होणार नाही. हे सर्व मुरब्बी राजकारणी आहेत. हे भांडताना दिसत असले तरी त्याचा काही फरक पडणार नाही. सत्तेवर तेव्हा त्या बाहेरच्या लोकांवर त्याचा काही परिणाम होणार नाही असंही यावेळी बच्चू कडू म्हणाले.
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला