ईडीची नोटीस : संजय राऊतांनी खुलासा करून मोकळे व्हावे, प्रकाश आंबेडकर यांचा सल्ला

Sanjay Raut & Prakash Ambedkar

मुंबई : संजय राऊतांना पैसा हा राऊतांकडूनच आला. त्यांच्यात नात्याचे संबंध नाहीत, असे ईडीचे म्हणणे आहे. तेव्हा संजय राऊत यांनी ५५ लाख कशासाठी आलेत, याचा खुलासा करावा. म्हणजे संजय राऊत (Sanjay Raut) मोकळे होतील, अशी प्रतिक्रिया वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांनी वर्षा राऊत यांना ईडी (सक्तवसुली संचलनालया)ने बजावलेल्या नोटीस प्रकरणी दिली.

शिवसेनेचे नेते संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत यांना ईडी (सक्तवसुली संचलनालया)ने, पंजाब-महाराष्ट्र सहकारी बँकेच्या खात्यातून संजय राऊतांच्या सहकाऱ्यासोबत केलेल्या व्यवहाराप्रकरणी चौकशीसाठी नोटीस पाठवली आहे. यानंतर राजकीय क्षेत्रात खळबळ उडाली आहे.

या संदर्भात प्रकाश आंबेडकर म्हणालेत, नेते एकाच वेळी व्यापारी आणि राजकर्ते झाले की ईडी मागे लागते. राजकारण करताना चारित्र्य मोकळे असावे. ईडीने रेड केली म्हणजे तुम्ही टॅक्सेस भरलेले नाहीत. इथल्या व्यापारी कारखानदारांच्या मागेही ईडी लागली आहे. व्यापारी म्हणून काम करता तर राजकारणाचे ‘शिल्ड’ घेऊ नये.

याआधी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray), शिवसेनेचे (Shivsena) आमदार प्रताप सरनाईक (Pratap Sarnaik), भाजपामधून नुकतेच राष्ट्रवादीत प्रवेश केलेले एकनाथ खडसे (Eknath Khadse) व इतर नेत्यांनाही ईडीने नोटीस बजावल्या आहेत. ईडीच्या नोटीसचा हा वाद आणखी चिघळल्याची लक्षणे दिसत आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER