
जळगाव : ईडीने (ED) राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) नेते एकनाथ खडसे (Eknath Khadse) याना नोटीस पाठवल्याची बातमी पुढे आली होती. मात्र या बातमीला खडसेंकडून कुठलीही माहिती देण्यात आलेली नव्हती. आता मात्र खुद्द खडसे यांनी नोटीस मिळाली असल्याचं कबूल केलं. होय, मला ईडीची नोटीस मिळाली अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी दिली. धुळे जिल्ह्यातील शिरपूर शहरातील भाजपचे कार्यकर्ते राष्ट्रवादीत आले. ईडीची नोटीस आल्यानंतर मला महाराष्ट्रातून फोन येत आहेत. मला सहानुभूतीच मिळत आहे. लोकांना हे आवडत नाही, असं एकनाथ खडसे म्हणाले.
ईडीची नोटीस आल्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रभरातून मला सहानुभूतीचे फोन येत आहे. लोकांना असं वाटते की हा एक प्रकारचा माझ्यावर अन्याय आहे. वारंवार चौकशा लोकांना आवडलेल्या दिसत नाहीत, पण काही निर्णय असतात, त्या आधीन राहून काम करायचं असतं, अशी प्रतिक्रिया खडसे यांनी दिली.
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला