
मुंबई :- शिवसेना (Shiv Sena) नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांच्या पत्नी वर्षा राऊत यांना ईडीने (ED) नोटीस पाठवली असून त्यावरून राजकारण चांगलंच तापलं आहे. शिवसेना नेते आणि राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांनीही त्यावर प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. ईडीची कारवाई राजकीय हेतूने प्रेरित असून महाविकास आघाडी कुणालाही घाबरत नाही, असा इशारा आदित्य ठाकरे यांनी दिला आहे.
आदित्य ठाकरे यांनी आज मुंबईतील रस्ते कामांची पाहणी केली. यादरम्यान त्यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला . ईडीची नोटीस राजकीय हेतूने प्रेरित आहे, हे सर्वांनाच माहीत आहे. राजकीय आकसापोटील या नोटीसा पाठवल्या जात आहेत. हे सर्व राजकीय आहे. महाविकास आघाडी त्याला घाबरत नाही. महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) घट्ट आणि मजबूत आहे, असे सांगतानाच आम्ही देश आणि महाराष्ट्रासाठी काम करत असून आमचे काम सुरूच ठेवणार असं आदित्य ठाकरे यांनी स्पष्ट केले.
ही बातमी पण वाचा : ईडीच्या नोटीसवर संजय राऊतांची पहिली प्रतिक्रिया , म्हणाले…
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला