ईडीचा सर्वाधिक गैरवापर काँग्रेसच्या सत्ताकाळात झाला : देवेंद्र फडणवीसांचा घणाघात

ED - Devendra Fadnavis

मुंबई : राज्य सरकारचा बांधकाम घोटाळा उघडकीस आणला आहे. त्यातील संबंधितांवर कारवाई व्हावी अशी भाजपची (BJP) मागणी आहे तसेच ईडीचा सर्वाधिक गैरवापर काँग्रेस (Congress) पक्षाच्या सत्ता काळात झाला आहे, त्यामुळे तुम्ही काही केले नाही तर घाबरता कशाला असा प्रश्न माजी मुख्यमंत्री, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी विचारला आहे.

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हे सोमवारी कोल्हापूर हून आंबोली मार्गे गोव्याला जात असताना काही काळ सावंतवाडी येथे थांबले होते. यावेळी ते बोलत होते .

ज्यांच्या बद्दल तक्रारी असतील पुरावे असतील त्यांची चौकशी होते.मात्र आपण काहि केले नाही तर घाबरण्याचे कारण काय? कोणतीही एजन्सी कोणावर थेट कारवाई करू शकत नाही.भाजपने कोणत्या ही चौकशी संस्थेचा गैरवापर केला नाही.काँग्रेसच्या काळातच तो अधिकचा झाला आहे.अशी टिका राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER