अनिल देशमुख यांच्याविरोधात आता ईडीने गुन्हा दाखल !

ed-registers-case-against-ncp-leader-anil-deshmukh-at-mumbai

मुंबई : माजी गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांच्याविरोधात आता सक्तवसुली संचानालय अर्थात ईडीने (ED) सुद्धा गुन्हा दाखल केला आहे.

मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी राष्ट्रवादीचे (NCP) नेते आणि माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर केलेल्या 100 कोटी रुपयांच्या खंडणी वसुलीच्या आरोप प्रकरणी नव्या घडामोडीना वेग आला आहे .

अनिल देशमुख यांची प्राथमिक चौकशी केल्यानंतर सीबीआयने (CBI) गुन्हा दाखल केला. हा गुन्हा दिल्लीत दाखल करण्यात आला असून देशमुख यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप लावण्यात आले आहे. आता या प्रकरणात ईडीने सुद्धा एंट्री केली आहे. ईडीकडून अनिल देशमुख यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यामुळे लवकरच अनिल देशमुख यांची ईडीमार्फत चौकशी होण्याची शक्यता आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button