मोठी बातमी : शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांच्या घरी, कार्यालयावर ईडीचा छापा

Pratap Sarnaik - ED Raid

मुंबई : आजची सर्वात मोठी बातमी पुढे आली आहे. आज सकाळी ठाण्यातील शिवसेनेचे (Shiv Sena) आमदार प्रताप सरनाईक (Pratap Sarnaik) यांच्या घरावर आणि कार्यालयावर ईडीचे (ED) छापे पडले आहेत. सरनाईक यांच्यासह त्यांच्या दोन मुलांच्या घरावरही ईडीकडून छापेमारी करण्यात आल्याची माहिती पुढे आली आहे.

सरनाईक यांचे पुत्र पूर्वेश आणि विंहग सरनाईक यांच्या घराही ईडीचे अधिकारी दाखल झाले आहेत. ईडीने नेमक्या कोणत्या प्रकरणाच्या तपासासाठी ईडीचं पथक सरनाईक यांच्या घरी आणि कार्यालयात पोहोचलं आहे हे अद्याप समजू शकलेलं नाही. मात्र मणी लॉन्डरिंगच्या प्रकरणातून ही छापेमारी करण्यात आल्याची माहिती पुढे आली आहे.

दरम्यान प्रताप सरनाईक सध्या देशाबाहेर आहेत. महत्त्वाचं म्हणजे सरनाईक यांच्याव्यतिरक्त आणखी १० ठिकाणी ईडीने छापे मारल्याची माहिती पुढे आली आहे. त्यामुळे शिवसेनेचे आणखी काही नेते ईडीच्या रडारवर असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER