बांधकाम व्यावसायिक अविनाश भोसले यांच्या कार्यालयावर ईडीचा छापा

Avinash Bhoslae & ED

पुणे : पुण्यातील (Pune) प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक आणि उद्योजक अविनाश भोसले (Avinash Bhosale) यांच्या कार्यालयावर ईडीच्या (Enforcement Directorate) अधिकाऱ्यांनी छापेमारी केली आहे. सकाळी ८.३० पासून ABIL हाऊसमध्ये झाडाझडती करत आहेत. अविनाश भोसले हे मोठे बांधकाम आणि हॉटेल व्यावसायिक आहेत. फेमासंबंधीच्या प्रकरणात त्यांची ईडीकडून चौकशी होत आहे. हे सहा वर्षांपूर्वीचे विदेशी चलन प्रकरण आहे.

गेल्या काही दिवसांपासून ईडीच्या फेऱ्यात चौकशीला सामोरे जात असलेले पुण्यातील बांधकाम व्यावसायिक अविनाश भोसले यांच्या कार्यालयावर ईडीने छापा टाकला. सकाळी ८.३० वाजताच ईडीचं पथक पुण्यातील ABIL या कार्यालयात दाखल झालं. केंद्रीय सुरक्षा दलाच्या गार्डचा पहारा सध्या या कार्यालयात आहे. विदेशी चलन प्रकारात चौकशी सुरू असताना ईडीचं पथक थेट पुण्यात तळ ठोकून बसल्याने, भोसले यांच्या अडचणीत आणखी वाढ होण्याची शक्यता आहे.

MT LIKE OUR PAGE FOOTER