उन्मेष जोशी यांची ईडीकडून सात तास चौकशी

Unmesh Joshi-ED

मुंबई :- माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना नेते मनोहर जोशी यांचे चिरंजीव आणि बांधकाम व्यावसायिक उन्मेष जोशी यांची कोहिनूर मिल प्रकरणात झालेल्या आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी ईडीने सात तास चौकशी केली. चौकशी समाधानकारक झाल्याचा दावा उन्मेष जोशींनी केला असून ईडी पुन्हा चौकशीसाठी बोलावणार असल्याचे ते म्हणाले.

ही बातमी पण वाचा : राज ठाकरेंना ईडी ची नोटीस येणार हे मला आधीच माहिती होते – प्रकाश आंबेडकर

उन्मेष जोशी यांना नोटीस बजावण्यात आली होती. त्यानुसार उन्मेष हे आज दुपारी ईडीच्या कार्यालयात हजर झाले. चौकशीला सामोरे जाण्यापूर्वी त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवादही साधला होता. सायंकाळी ७ वाजताच ते ईडीच्या कार्यालयातून बाहेर पडले. ईडीने केलेल्या चौकशीने आपण समाधानी आहोत. ईडीच्या सर्व प्रश्नांची उत्तरे देण्यात आली दिल्याचे ते म्हणाले. जोशींनी इन्फ्रास्ट्रक्चर लीजिंग अँड फायनान्शियल सर्व्हिसेस (आयएलएफएस) या सरकारी क्षेत्रातील कंपनीने २२५ कोटींची गुंतवणूक केली होती.

कालांतराने जोशी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी ९० कोटीला कंपनीचे समभाग विकले होते. त्यानंतरही कंपनीला अगाऊ कर्ज देण्यात आले होते. या कर्जाचा परतावा करण्यात आला नव्हता. त्यामुळे कोहिनूर सिटी एनएलने २०११मध्ये काही मालमत्ता विकून ५०० कोटींचा परतावा करण्याच्या करारावर सही केली होती. त्यामुळे आरएलएफएसकडून कोहिनूरला पुन्हा १३५ कोटींचे कर्ज देण्यात आले होते. या प्रकरणात अनियमितता झाल्याचे आढळून आल्याने ईडीने त्याची चौकशी सुरू केली आहे.