राज्यमंत्री विश्वजित कदम यांच्या पत्नीला ईडीने बजावली नोटीस

Swapnali Kadam & ed

मुंबई : ठाकरे सरकारमधील मंत्री आणि काँंग्रेस नेते विश्वजित कदम (Viswajit Kadam) यांच्या पत्नी स्वप्नाली कदम (Swapnali Kadam) यांना ईडीने (Enforcement Directorate) नोटीस बजावल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. आज त्या ईडीच्या कार्यालयात जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. स्वप्नाली यांचे वडील अविनाश भोसले यांच्या मालमत्ता प्रकरणी स्वप्नाली यांची चौकशी होणार असल्याची माहिती पुढे आली आहे.

दरम्यान, याबाबत आपल्याला कुठलीही कल्पना नसल्याची माहिती विश्वजित कदम यांनी दिली. ईडीने यापूर्वी राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या नेत्यांना नोटीस पाठवली होती. त्यानंतर आता ईडीच्या रडारवर काँग्रेसही असल्याचं सांगितलं जात आहे. राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे आणि शिवसेनेचे (Shivsena) आमदार प्रताप सरनाईक (Pratap Sarnaik) यांना ईडीने नोटीस पाठवली होती. तसंच ईडीने त्यांची प्राथमिक चौकशीही केली आहे.

दरम्यान, विश्वजित कदम यांनी ईडी नोटिसीवर बोलण्यास असमर्थता व्यक्त केली. यासंदर्भात मला कल्पना नसल्याचं स्पष्ट करत सध्या यावर मी बोलणार नसल्याचं विश्वजित कदम यांनी म्हटलं.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER