तापसी-अनुरागवर ‘ED’ची टांगती तलवार

मुंबई :- बॉलिवूड अभिनेत्री तापसी पन्नू (Tapasi Pannu), चित्रपट दिग्दर्शक अनुराग कश्यप (Anurag Kashyap) आणि विकास बहल (Vikas Behl) यांच्या घरावर बुधवारी रात्री आयकरची धाडी सुरू होती. पुण्याच्या हॉटेलमध्ये अनुराग आणि तापसी यांची चौकशी केली गेली. या दोघांची आयकर अधिकाऱ्यांनी तासंतास चौकशी केली. आजसुद्धा धाडी सुरूच आहेत. आयकर विभागाने मुंबई व पुणे येथे बुधवारी ३० जागी धाड टाकली. यात अनेक कंपन्यांची खाती स्थगित केली. अधिकाऱ्यांनी तापसी आणि अनुराग यांच्या संपूर्ण घराची झळती घेतली.

बुधवारी तापसी आणि अनुराग यांच्या घरावर दोन राज्यांच्या आयकर अधिकाऱ्यांनी धाड टाकली. यात तीन अधिकारी हे उत्तर प्रदेशचे तर तीन महाराष्ट्रातील होते. माहितीनुसार, अनुराग आणि तापसी यांच्या घरावर ईडीकडून धाड टाकली जाऊ शकते. अभिनेता विकास बहल पूर्वी अनुराग कश्यपच्या कंपनीचा भाग होता. एका मॉडेलने #मीटूमध्ये विकास बहलवरही आरोप केले होते. त्यानंतर अनुराग कश्यप याने विकासला ‘फॅंटम फिल्म्स’मधून काढून टाकले. या कलाकारांनी टॅक्स चोरी केल्याचे समोर आले आहे.

मीडिया रिपोर्टनुसार, या सेलिब्रिटींवर आयकर विभागाने छापा टाकण्याची कारणे सांगितली आहेत. निर्माता मधु मंटेनाबद्दल म्हटले जाते की, त्यांचे शेवटचे पाचही चित्रपट फ्लॉप होते. त्यांनी ५०० कोटींचा ‘रामायण’ आणि २०० कोटींचा ‘द्रौपदी’ हे चित्रपट बनवण्याची घोषणा केली होती. त्यांच्या नव्या प्रोजेक्टची घोषणा व मिळकत आयकर अधिकाऱ्यांच्या नजरेत होती. विकास बहल हे मधु मंटेनाबरोबर अनेक फ्लॉप चित्रपटांचे सह-निर्मातादेखील होते, परंतु त्यांच्या निर्मिती आणि दिग्दर्शनात बनलेल्या ‘सुपर थर्टी’ने १४७ कोटी कमवले.

तापसीकडे अनेक चित्रपट

बॉलिवूड (Bollywood) अभिनेत्री तापसी पन्नू हीच्याकडे सध्या चित्रपटांची रंग आहे. ती लवकरच ‘लूट लपेटा’मध्ये दिसणार आहे. या मधला पहिला लूक तापसीने शेअर केला आहे. या पात्रात तिचे नाव ‘सावी’ आहे. यापूर्वी अनुराग कश्यप समवेत अभिनेत्री तापसी पन्नूने ‘मनमर्जिया’ नावाचा चित्रपट केला. यावेळी ती ट्रॅव्हलवर आधारित दुसर्‍या चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. शिवाय ती मिताली राजचा बायोपिकसुद्धा करत आहे.

जितेंद्र आव्हाड यांचे विधान!

कॅबिनेट मंत्री जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी अनुराग कश्यप, तापसी पन्नू आणि इतर लोकांवर पडलेल्या आयकर धाडीसंदर्भात सांगितले की, “हे छापे त्याच लोकांवर टाकले जात आहेत. ज्यांना केंद्र सरकारच्या धोरणांवर प्रश्न पडत होते. जे लोकशाही वाचवण्याचा प्रयत्न करत आहे. यांच्यावर निवडकपणे हे छापे टाकले जात आहे. कर चुकवणे ही केवळ एक सबब आहे.”

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER