एकनाथ खडसेंना ईडीची नोटीस, चौकशीला येण्याचे नमूद

ED - Eknath Khadse

मुंबई : भाजपच्या (BJP) राज्यातील नेतृत्वावर गंभीर आरोप करून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये (NCP) दाखल झालेले ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे (Eknath Khadse) याना ईडीकडून (ED) चौकशीसाठी नोटीस बजावण्यात आल्याची माहिती पुढे आली आहे. टीव्ही 9 मराठीने यासंदर्भात वृत्त प्रसारित केले आहे. त्यानुसार टीव्ही 9 मराठीने दिलेल्या माहितीनुसार ईडीने 30 तारखेला एकनाथ खडसे यांना चौकशीसाठी बोलावले आहे. हा राष्ट्रवादी काँग्रेस आणि एकनाथ खडसे यांच्यासाठी मोठा धक्का मानला जात आहे.

मात्र, ‘ईडी’ला नक्की कोणत्या प्रकरणात एकनाथ खडसे यांची चौकशी करायची आहे, हे अद्याप कळू शकलेले नाही. त्यामुळे राजकीय वर्तुळात ‘ईडी’ला एकनाथ खडसे यांच्याविरुद्ध नक्की कोणते पुरावे मिळाले आहेत, याविषयी तर्कवितर्कांना उधाण आले आहे. तर दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांकडून यावरुन भाजपला लक्ष्य करण्यात आले आहे. भाजपकडून सूडबुद्धीने ईडीची चौकशी लावण्यात आल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अंकुश काकडे आणि अमोल मिटकरी यांनी केला. परंतु, एकनाथ खडसे भक्कम आहेत, ते भाजपला पुरुन उरतील, असा विश्वासही अमोल मिटकरी यांनी व्यक्त केला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER