टॉप्स सिक्युरिटी प्रकरणात ‘ईडी’कडून ‘एमएमआरडी’च्या आयुक्तांना समन्स

मुंबई : ‘ईडी’कडून (ED) मुंबई मेट्रोपॉलिटन क्षेत्र विकास प्राधिकरणाचे (एमएमआरडीए) (MMRDA) सचिव आर.ए. राजीव (RA Rajiv) यांना समन्स बजावण्यात आले आहे. त्यामुळे आता आर.ए. राजीव यांना ‘ईडी’समोर हजर राहावे लागेल. या चौकशीत ते काय सांगतात आणि त्याचे काय परिणाम होणार, याकडे आता साऱ्यांचे लक्ष लागले आहे.

या प्रकरणात ईडीने आतापर्यंत दोन जणांना अटक केली आहे. यामध्ये प्रताप सरनाईक यांचे व्यावसायिक भागीदार अमित चांदोळे यांचा समावेश होता.

यापूर्वी डिसेंबर महिन्यात ‘ईडी’कडून शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांची चौकशी करण्यात आली होती. त्यांचा मुलगा पूर्वेश सरनाईक यालाही ईडीने चौकशीसाठी पाचारण केले होते. त्यामुळे शिवसेनेच्या गोटात मोठी खळबळ उडाली होती.

मात्र, प्रताप सरनाईक यांच्या डिसेंबर महिन्यातील चौकशीनंतर हे प्रकरण फारसे पुढे सरकले नव्हते. तेव्हा प्रताप सरनाईक यांनी ईडीने अगदी खेळीमेळीच्या वातावरणात आपली चौकशी केल्याची प्रतिक्रिया दिली होती. मात्र, आता ईडीने थेट ‘एमएमआरडीए’च्या आयुक्तांनाच समन्स पाठवल्याने नव्या चर्चा रंगल्या आहेत .

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाMT LIKE OUR PAGE FOOTER