
मुंबई : शिवसेना (Shivsena) खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांच्या पत्नी वर्षा राऊत (Varsha Raut) यांची सक्तवसुली संचालनालयाकडून (ईडी) पुन्हा चौकशी होणार आहे. त्यासाठी ईडीने (Enforcement Directorate) वर्षा राऊत यांना नवे समन्स पाठवले आहे.
त्यानुसार वर्षा राऊत यांना ११ जानेवारीला पुन्हा एकदा चौकशीला सामोरे जावे लागणार आहे. यापूर्वी ४ जानेवारीला पीएमसी बँक घोटाळाप्रकरणी वर्षा राऊत यांची ईडीकडून चौकशी करण्यात आली होती. ईडीच्या अधिकाऱ्यांनी जवळपास चार तास वर्षा राऊत याची विचारपूस केली होती. प्रवीण राऊत (Pravin Raut) हे पंजाब-महाराष्ट्र सहकारी बँक (पीएमसी) घोटाळ्यातील आरोपी आहेत. प्रवीण राऊत यांच्याशी संजय व वर्षा राऊत यांचे आर्थिक संबंध असून, त्यांचाही या घोटाळ्यात सहभाग असल्याचा ईडीला संशय आहे.
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला