मुंबईत भव्य कार्यालयासाठी ईडी (ED) जागेच्या शोधात

ED

मुंबई :- ईडी (अंमलबजावणी संचालनालयाने) (ED) दक्षिण मुंबईत भव्य कार्यालयासाठी जागेचा ( Huge Office) शोध घेण्यास सुरुवात केली आहे. ईडी ३१,७४८ चौरस फूट, चटई क्षेत्र असलेले कार्यालय शोधत आहे. ईडीला स्वतंत्र वीज आणि पाणीपुरवठा असलेल्या स्वतंत्र पार्किंग जागेसह कार्यालय हवे आहे.

परिसर व्यावसायिक वापरासाठी मंजूर असला पाहिजे. ऑफर थेट जागेच्या मालकांकडूनच असावी. दलालांची मध्यस्थी मान्य केली जाणार नाही. संचालनालयाने इच्छुक मालकांना दोन निवेदिता सादर करण्यास सांगितले आहे. तांत्रिक बिड आणि किंमत बिड. तांत्रिक बिडमध्ये आमंत्रित निविदा, सामान्य अटी व शर्ती आणि ऑफरचा तपशील असेल. किंमत बोलीमध्ये मासिक भाडे आणि इतर शुल्काचा समावेश असेल. ईडीला त्यांची जागा भाड्याने देण्यास इच्छुक लोक बल्लार्ड इस्टेट येथे असलेल्या ईडीच्या कार्यालयातून ३१ डिसेंबरपर्यंत बोलीच्या अटी मिळवू शकतात.

सीलबंद ऑफर प्राप्त करण्याची अंतिम तारीख ३१ डिसेंबर २०२० रोजी ५ वाजेपर्यंत आहे. केवळ तांत्रिक बिडच्या सीलबंद ऑफर ४ जानेवारी २०२१ रोजी (दुपारी ३ वाजता) उघडल्या जातील. अंमलबजावणी संचालनालयाच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने याची पुष्टी केली की, संचालनालय कार्यालयासाठी शोध घेत आहे आणि म्हणूनच नोटीस काढण्यात आली आहे.

ही बातमी पण वाचा : एड्सग्रस्ताने केलेला बलात्कार हा खुनाचा प्रयत्न नव्हे

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER