ईडीची चौकशी म्हणजे राजकीय दबाव तंत्र – सुप्रिया सुळे

Supriya Sule-Raj Thackeray

ठाणे :- सांगली – कोल्हापुर भागात ओढवलेल्या पुरस्थितीमध्ये आपला संसार गमावलेल्या आया – बहिणींना संसार उभा करण्यासाठी हातभार लावण्याच्या उद्देशाने ठाणे शहर राष्ट्रवादीच्या वतीने जीवनावश्यक वस्तुंचे साहित्य गुरुवारी रवाना करण्यात आले. यावेळी सुप्रिया सुळे यासुध्दा उपस्थित होत्या. पत्रकारांशी बोलतांना त्यांनी दमानियांचे नाव न घेता टिका केली. या सरकारकडून मनी आणि मसलचा वापर करुन दबाव टाकून अशा प्रकारे चौकशी सुरु असल्याची टिकाही त्यांनी केली. ईडीची जी चौकशी सुरु आहे, ते केवळ आगामी निवडणुका डोळ्यासमोर ठेवूनच हे सरकार करीत असल्याचेही त्यांनी सांगितले.

एकीकडे पुर परिस्थिती असतांना सरकारमधील मंत्री तिकडे सेल्फी काढतांना दिसत होते, याचाच अर्थ त्याठिकाणीसुध्दा त्यांचा प्रचारच सुरु असल्याचे दिसत आहे. एकूणच हे सरकार असंवेदनशील झाले असून त्यांना जनतेच्या प्रश्नांशी काही देणो घेणो नसल्याचेही मत त्यांनी व्यक्त केले. हाती असलेली सत्ता पैशाच्या जोरावर हे सर्व सुरु असून ते आपल्या राज्यासाठी आणि देशासाठी घातक असल्याची टिकाही त्यांनी केली. शिवसेना आणि भाजपमध्ये जी काही मेघा भरती सुरु आहे, ती का आणि कशी सुरु आहे, हे संपूर्ण राज्यच बघत आहे. यामध्ये केवळ कोणत्या तरी प्रकरणाची चौकशी, धमक्या, दबाव आणूनच ही भरती सुरु असल्याचा आरोप त्यांनी यावेळी केला.

ही बातमी पण वाचा : बाळासाहेबांचे संस्कार जिवंत असल्याने, उद्धव ठाकरे राजच्या बाजूने उभे झाले – सुप्रिया सुळे

दरम्यान पुरपरिस्थीच्या काळात मदतीसाठी राष्ट्रवादीकडून सवरेतोपरी मदतकार्य सुरु आहे. या संदर्भात मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन एखादे गाव दत्तक द्यावे अशी मागणी केली असल्याचेही त्यांनी सांगितले.

राज ठाकरे आणि पी चीदंबरमं यांची चौकशी म्हणजे एक राजकीय दबावतंत्र आहे. असेच इंदिरा गांधी यांच्या बद्दल ही घडल होत. इंदिरा गांधीना जेल मधे टाकल्यानंतर इंदिरा गांधीना न माननारी लोक देखील इंदिरा गांधींच्या मागे उभी होती. हे सरकारने विसरु नये. अशा परिस्थितीत परिवारच मागे उभा राहतो. त्यामुळे त्यांच्या परिवारावर कोणी टिका करू नये ई डी म्हणजे सरकारचा राजकीय स्टंट आहे. निवडणुकीच्या तोंडावर हे सर्व सुरु आहे. ईडीच्या दबाव तंत्रमुळे सर्व नेते सेना बीजेपी मध्ये जात आहेत.

जितेंद्र आव्हाड – राष्ट्रवादी आमदार