मुंबईतील सुप्रसिद्ध बिल्डर ओंकार ग्रुपच्या कार्यालयावर ईडीची धाड

मुंबई : शहरातील सुप्रसिद्ध बिल्डर ओंकार ग्रुपच्या कार्यालयांवर ईडीने कारवाईचा (ED Case) बडगा उगारला आहे. त्यांच्या कार्यालयावर धाड टाकली आहे. बँकांकडून घेतलेले कर्ज आणि आर्थिक अनियमिततेच्या संशयावरून ईडीने ही कारवाई केली आहे. ईडीने आपल्या कारवाईत आतापर्यंत सायन येथील ओंकार बिल्डर कार्यालय, प्रभादेवी येथील ब्यूमोंटे अपार्टमेंट तसेच नेपियन्सी रोडवरील आशियाना बिल्डिंग येथील ओंकार ग्रुपच्या (Builder Omkar Group) कार्यालयावर धाड टाकली आहे. याबाबतचे वृत्त टीव्ही-९ ने दिले आहे.

मागील काही दिवसांपासून ईडीकडून अनेक नेते, विकासकांच्या घरावर, कार्यालयावर धाडसत्र सुरू आहे. धाडीच्या माध्यमातून आर्थिक गैरव्यवहार तसेच इतर अनियमितता यांची ईडीकडून चौकशी केली जात आहे. त्याचाच एक भाग म्हणून शहरातील बांधकाम क्षेत्रातील सुप्रसिद्ध कंपनी ओंकार ग्रुपच्या कार्यालयावर ईडीने धाड टाकली. मिळालेल्या माहितीनुसार ओंकार ग्रुपने काही बँकेकडून कर्ज घेतलेले आहे. या कर्जामध्ये तसेच अन्य काही व्यवहारांमध्ये आर्थिक अनियमितता असल्याचा संशय ईडीला आहे. त्यामुळे ईडीने या ग्रुपच्या विविध ठिकाणांवरील कार्यालयांवर छापा टाकला आहे. ईडीने आतापर्यंत सायन येथील ओंकार बिल्डर कार्यालय, प्रभादेवी येथील ब्यूमोंटे अपार्टमेंट, नेपियन्सी रोडवरील आशियाना बिल्डिंग या जागेवर धाड टाकली आहे.

काही दिवसांपूर्वी ईडीने जेपी इन्फ्रास्ट्रक्चरच्या कार्यालयावरसुद्धा कारवाई केली होती. मिळालेल्या माहितीनुसार जेपी इन्फ्रास्ट्रक्टर या बांधकाम क्षेत्रातील कंपनीत उत्तरप्रदेशमधील एका बड्या नेत्याने पैसे गुंतवलेले आहेत. ईडीबरोबरच या कंपनीवर आयकर विभागानेसुद्धा कारवाई केली होती. याच प्रकरणात आता ओंकार बिल्डरवर ईडीमार्फत कारवाई सुरू आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER