
मुंबई :- शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक (Pratap Sarnaik) यांच्या घरावर चार दिवसांपूर्वी ईडीने (ED) छापा टाकला. सरनाईक यांच्या मुलाची चौकशी सुरू केली आहे. त्यावर भाजप राजकारण करून हेतुपुरस्पर ईडीच्या चौकशी लावत असल्याचा आरोप सत्ताधाऱ्यांकडून होत आहे.
आता यावर राज्यमंत्री बच्चू कडू (Bacchu Kadu) यांनी जोरदार टीका केली. तुम्ही अनेकांची ईडी चौकशी लावली; परंतु भाजपचे रावसाहेब दानवे (Raosaheb Danve) काही शुद्ध तुपातले आहेत का, असे कडू म्हणाले. राज्यातील भाजपच्या अनेक नेत्यांची ईडीने चौकशी केल्यास त्यांचे पितळ उघडे होतील .
राज्यात आतापर्यंत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar), मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray), आता शिवसेनेचे प्रताप सरनाईक यांच्यावर ईडीची चौकशी लावली आहे. भाजप नेत्यांनी मोठ्या प्रमाणावर संपती गोळा केली असूनसुद्धा एकाही भाजप नेत्यावर ईडीची चौकशी लागत नाही.
तुम्ही पक्षपातीपणा करत नाही तर मग भाजपच्या एकाही नेत्यावर ईडीची चौकशी का लागत नाही, असा सवाल बच्चू कडू यांनी उपस्थित केला आहे. जो बोलेल, आवाज उठवेल त्याचा आवाज दाबण्याचा प्रयत्न होत आहे. लोकशाहीत घटनेची पायमल्ली करण्याचे काम केंद्र सरकारकडून होत असल्याचा गंभीर आरोपही कडू यांनी केला आहे.
ही बातमी पण वाचा : भाजपला मराठवाड्याच्या मातीत असे गाडा की ते निवडणूकच विसरले पाहिजे; धनंजय मुंडेंचा घणाघात
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला