प्रताप सरनाईक यांची १०० कोटींची जमीन ईडीने केली जप्त – सोमय्यांचा दावा

Kirit Somiya & Pratap sarnaik

टिटवाळा : शिवसेनेचे (Shivsena) आमदार प्रताप सरनाईक (Pratap Sarnaik) यांची १०० कोटी रुपये किमतीची ७८ एकर जमीन ईडीने जप्त केली, असा दावा भाजपाचे नेते किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांनी केला आहे. हि जमीन टिटवाळ्याच्या गुरुवली येथे आहे, अशी माहिती त्यांनी दिली. (ED took possession 78 acres land of pratap sarnaik, says kirit somaiya)

किरीट सोमय्या आज टिटवाळ्यातील गुरवली गावात येथे आले होते. त्यांनी ‘विहंग आस्था हौसिंग कंपनी’च्या जागांची पाहणी केली. प्रताप सरनाईक आणि मोहित अग्रवाल यांनी एनएसईएल घोटाळ्याचे १०० कोटी रुपये विहंग आस्था हौसिंग कंपनीत वळवले होते. त्यातून गुरवली येथे ११२ जमिनी विकत घेतल्या होत्या. त्यातील ७८. २७ एकर जमिनीचा कालच ईडीने ताबा घेतला आहे. या जागेवर ईडीने आपले बोर्डही लावले आहेत. घोटाळ्यातील १०० कोटी परत न केल्यास अन्य मालमत्ताही जप्त केली जाईल, असा इशारा ईडीने सरनाईक यांना दिला आहे, असा दावा सोमय्या यांनी केला आहे.

सरकारच्या दबावाला भीक घालत नाही

सरनाईक यांचा तिसरा घोटाळा मी बाहेर काढला आहे. ठाकरे सरकार घाबरले आहे. एकामागोमाग घोटाळे बाहेर पडत आहेत. औरंगजेबाचा जयजयकार करणाऱ्या ठाकरे सरकारने विरोधकांवर दबाव आणण्यासाठी विरोधकांची सुरक्षा काढून घेतली आहे. विरोधी पक्ष ठाकरे सरकारच्या अशा प्रकारच्या कोणत्याही दबावाला भीक घालत नाही. आमच्या सुरक्षेपेक्षा जनतेची सुरक्षा महत्वाची आहे, असं ते म्हणाले. (ED took possession 78 acres land of pratap sarnaik, says kirit somaiya)

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER