प्रताप सरनाईकांच्या अडचणी वाढणार; लोणावळ्यातील रिसॉर्टवर ED-CBIची धाड

Pratap Sarnaik

पुणे :- बेहिशेबी मालमत्ता प्रकरणात रडारवर असलेल्या शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक (Pratap Sarnaik) यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. या प्रकरणात सक्तवसुली संचलनालय (ED) आणि केंद्रीय अन्वेषण विभागाने (CBI) लोणावळातील एका रिसॉर्टवर धाड टाकल्याची माहिती समोर आली आहे.

सूत्रांच्या माहितीनुसार, CBI आणि ED ने सरनाईक यांना ताब्यात घेण्यासाठी ही धाड टाकल्याची चर्चा आहे. ‘प्रताप सरनाईक गायब आहे,’ असा आरोप भाजप नेते किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांनी ट्विट करून केला आहे. याबाबत अद्यापही अधिकृत माहिती जाहीर केली नाही. यापूर्वी ईडीने बेहिशेबी मालमत्ता प्रकरणात प्रताप सरनाईक आणि त्यांच्या मुलाची चौकशी केली होती. परंतु, हा तपास थांबवण्यात आला. मात्र, आता सरनाईक यांच्या रिसॉर्टवर धाड टाकल्यामुळे नवी माहिती पुढे येणार का, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.

मागील वर्षी नोव्हेंबर महिन्यात EDने प्रताप सरनाईक यांचे घर आणि कार्यालयावर धाडी टाकल्या. नंतर EDने सरनाईक आणि त्यांचा मुलगा विहंग यांचीही चौकशीही केली. तसेच भविष्यात आपण ईडीला सहकार्य करण्यासाठीही तयार असल्याचे प्रताप सरनाईक म्हणाले होते. तत्पूर्वी EDने टॉप ग्रुप आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी २५ नोव्हेंबरला अमित चांदोळे यांची EDने चौकशी केल्यांनतर अटक केली होती. अमित चांदोळे हे प्रताप सरनाईक यांचे व्यावसायिक भागीदार होते.

Disclaimer : बातमीत एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. महाराष्ट्र टुडेच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व महाराष्ट्र टुडे स्वीकारत नाही.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button