ईडीची कारवाई : हितेंद्र ठाकूरचा पुतण्या, सीएला अटक

ED & Hitendra Thakur

विरार :- पीएमसी बँक घोटाळाप्रकरणी ईडीने आमदार हितेंद्र ठाकूर यांच्या कुटुंबीयांच्या विवा ग्रुपवर धाडी टाकल्यानंतर ठाकूर यांचा पुतण्या मेहूल ठाकूर आणि सीए मदन गोपाल चतुर्वेदी यांनाही अटक केली आहे. मेहूल ठाकूर यांना अटक केल्याने वसई-विरारमध्ये एकच खळबळ उडाली आहे.

पीएमसी बँक घोटाळाप्रकरणी काल शुक्रवारी ईडीने हितेंद्र ठाकूर (Hitendra Thakur) यांच्या नातेवाइकांच्या विवा ग्रुपवर धाडी टाकल्या होत्या. या कारवाईनंतर ईडीने मेहूल ठाकूर आणि मदन गोपाल चतुर्वेदी या दोघांना काल संध्याकाळी ६ वाजता ताब्यात घेऊन ईडी कार्यालयात आणले होते. या ठिकाणी दोघांची सुमारे चार ते पाच तास चौकशी करण्यात आली. त्यानंतर या दोघांनाही मध्यरात्री अटक करण्यात आली. मेहूल ठाकूर हा विवा ग्रुपचा मॅनेजिंग डायरेक्टर आहे. तर मदन हा डायरेक्टर आहे. ईडीने काल वसई-विरारमध्ये पाच ठिकाणी धाडी मारल्या होत्या.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER