खत घोटाळ्यात राजदचे खासदार अमरेन्द्रधारी सिंह यांना अटक

A D Singh

दिल्ली : राज्यसभेतील राजदचे खासदार अमरेन्द्रधारी सिंह (Amarendradhari Singh) याना ईडी (ED) (प्रवर्तन निदेशालय) ने खत घोटाळ्याच्या प्रकरणात अटक केली आहे. दिल्ली येथील ईडीच्या कार्यालयात सिंह यांची चौकशी सुरू आहे. सिंह यांचा खतांची आयात – निर्यात (Fetilizer Scam) करण्याचा व्यवसाय आहे.

सिंह हे लालूप्रसाद यादव यांचे निकटचे सहकारी आहेत. राजदने मार्च २०२१ मध्ये त्यांना राज्यसभेवर पाठवले आहे. सीबीआय काही दिवसांपासून त्यांच्याविरुद्ध चौकशी करत होती. ते प्रकरण आता ईडीने आपल्या हाती घेतले आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button