सरनाईक यांच्या अडचणीत वाढ, व्यावसायिक भागीदार अमित चांदोळे यांना ईडीकडून (ED)अटक

ED

मुंबई : मनी लॉन्ड्रिंगप्रकरणात ईडीने शिवसेना आमदार प्रताप सरनाईक (Pratap-sarnaik) यांच्या घरावर आणि कार्यालयावर छापे टाकले होते. तसेच मुलगा विहंग याची चौकशी करून सोडून देण्यात आले होते. मात्र आता या प्रकरणी ईडीने पहिली अटक केली आहे. सरनाईक यांचे व्यावसायिक भागीदार असलेल्या अमित चांदोळे यांना ईडीने अटक केली आहे. अमित चांदोळे (Amit chandole)याच्या अटकेनंतर आता प्रताप सरनाईकांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, टॉप्स सिक्युरिटी या खासगी कंपनीशी संबंधित अमित चांदोळे यांना अटक केली आहे. आर्थिक अनियमितता असल्याप्रकरणी ही अटक करण्यात आली आहे. १२ तासांच्या सखोल चौकशीनंतर अमित यांना अटक करण्यात आली. अमित चांदोळे हे प्रताप सरनाईक यांचे अत्यंत निकटवर्तीय मानले जातात.

ही बातमी पण वाचा : कोण आहेत सरनाईक? – त्यांचा आलेख कसा वाढला?

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER