ईडी आणि सीबीआय पुरावे असल्याशिवाय कोणाची चौकशी करत नाही; राणेंचा राऊतांना टोला

Sanjay Raut-Narayan Rane

मुंबई :- शिवसेनेचे नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांच्या पत्नी वर्षा राऊत यांना ईडीने पाठवलेल्या नोटीसचं भाजप नेते नारायण राणे (Narayan Rane) यांनी समर्थन केलं आहे. “भाजप ईडीचा वापर करत नाही. केंद्र सरकार अंतर्गत ईडी आणि सीबीआय आहे. ईडी आणि सीबीआय पुरावे असल्याशिवाय कोणाची चौकशी करत नाही.”

असा टोला नारायण राणे यांनी राऊतांना हाणला आहे. तसेच, “संजय राऊत नेहमी बडबड करतात, मग जाऊ देना जरा ईडीच्या समोर.” अशा शब्दात त्यांनी राऊतांचे कान टोचले आहे. नारायण राणे म्हणाले, “त्यांनी पीएमसी बँकेत गैरव्यवहार केले. एक कोटीला घेतलेली मालमत्ता किती कोटीची आहे? आज त्याची किंमत अकरा ते बारा कोटी आहे. मग ती मालमत्ता एक कोटीला कशी काय मिळाली? आणि मग एक कोटीला कर्ज दाखवायचं, म्हणून ईडीला तक्रार गेली. त्या बँकेची चौकशी सुरू असताना हे पुरावे मिळाले, म्हणून ईडीने ही नोटीस दिली.

असंच कोणी ईडी वगैरे  नोटीस देत नाही.” असं नारायण राणेंनी सांगितलं. दरम्यान, संजय राऊत यांच्या पत्नीला ईडीने नोटीस पाठवल्याची माहिती समोर आल्यानंतर महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून भाजपवर गंभीर आरोप केले जात आहेत. भाजप ईडीला हाताशी घेऊन सुडाचं राजकारण करत आहे, असा आरोप महाविकास आघाडीच्या (Mahavikas Aghadi) नेत्यांकडून करण्यात आले आहेत. राज्याच्या महिला आणि बालविकास मंत्री यशोमती ठाकूर यांनी ईडीची चौकशी म्हणजे लोकशाहीचा खून आहे, असा घणाघात केला आहे.

ही बातमी पण वाचा :भाजपा दमबाजीला घाबरत नाही ; आशिष शेलारांचा राऊतांवर पलटवार

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER