हितेंद्र ठाकूर यांच्या विवा ग्रुपवर ईडीची कारवाई; सहा ठिकाणी छापेमारी

Hitendra Thakur

वसई-विरार : बहुजन विकास आघाडीचे (Bahujan Vikas Aghadi) अध्यक्ष हितेंद्र ठाकूर (Hitendra Thakur) यांच्या विवा ग्रुपवर सक्तवसुली संचालनालय, अर्थात ईडीने (ED) सकाळी कारवाई केली आहे. कथित पीएमसी बँक घोटाळाप्रकरणी ईडीने ही कारवाई केली आहे. वसई-विरार आणि मीरा भाइंदर परिसरातील सहा ठिकाणी ईडीने छापे टाकले आहेत. प्रवीण राऊत हे पंजाब-महाराष्ट्र सहकारी बँक (पीएमसी) (PMC Bank) घोटाळ्यातील आरोपी आहेत.

प्रवीण राऊत यांच्याशी हितेंद्र ठाकूर यांचे आर्थिक संबंध असून, त्यांचाही या घोटाळ्यात सहभाग असल्याचा ईडीला संशय आहे. पीएमसी घोटाळ्यात ५ ते ६ कोटींचं मनी लॉन्ड्रिंग झालं  असून त्यातील काही रक्कम विवा संस्थेत गुंतवण्यात आल्याचा संशय ईडीच्या अधिकाऱ्यांना आहे. त्यानुसार ईडीने आज विवा ग्रुपच्या कार्यालयांवर छापे टाकले. वसई-विरारसह मीरा भाइंदर परिसरात ईडीने धाडी टाकल्या असून यात काही महत्त्वाची कागदपत्रे ईडीच्या हाती लागली आहेत, अशी माहिती सूत्रांनी दिली. विवा ग्रुपशी संबंधित ठिकाणांची झाडाझडती अजूनही सुरूच असल्याची माहिती आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER