ओला-उबरमुळं वाहन क्षेत्रात मंदी – अर्थमंत्री निर्मला सीतारमण

Nirmala Sitharaman

नवी दिल्ली : वाहन क्षेत्रांमध्ये 19 वर्षांनंतर ही सगळ्यात मोठी मंदी सुरू आहे. आतापर्यंत लाखो लोकांनी आपला रोजगार गमावला आहे. यासाठी मोदी सरकारला दोषी धरण्यात येत आहे. सरकारच्या नियोजनाअभावी ही मंदी आल्याच्या प्रतिक्रिया लोकांनी दिल्या आहेत. चत्यानंतर अर्थमंत्री निर्मला सितारामण यांनी स्वतः पुढे येऊन वाहन क्षेत्रातील मंदीवर भाष्य करताना ओला-उबरमुळं वाहन क्षेत्रात मंदी आल्याचा दावा त्यांनी केला आहे.

तर जीएसटी दरामुळे ऑटो व्यवसायीक अडचणित येत असल्याचेही सांगण्यात येत आहे. जीएसटी दराच्या चढ उतारावर बोलताना ओला ऊबरवर बोट ठेवत निर्मला सितारामण म्हणाल्या, “BS6 स्टँडर्ड, नोंदणी शुल्काशी संबंधित प्रकरणं आणि लोकांची मानसिकता याचा वाहन क्षेत्रावर सर्वाधिक परिणाम झाला आहे. सध्या जास्तीत जास्त लोक गाडी खरेदी करण्याऐवजी ओला-उबरला प्राधान्य देतात. लोक गाडी खरेदी करुन EMI भरण्यापासून स्वतःला दूर ठेवतात आणि ओला-उबरला प्राधान्य देतात.”

निर्मला सीतारमण म्हणाल्या, “सरकार सकल घरेलु उत्पन्न (GDP) वाढवण्यासाठी पुरेपूर प्रयत्न करत आहे. शिवाय जीडीपीमधील घट हा विकासाच्या प्रक्रियेतीलच एक भाग आहे. पुढील तिमाहीत जीडीपी कसा वाढेल यावरच सरकारचा भर आहे. तसेच सरकार वाहन क्षेत्रातील मंदीतून बाहेर येण्यासाठी काम करत आहे. यासाठी लवकरच काही निर्णय घेतले जातील.” असे त्यांनी सांगीतले.

दरम्यान, ऑटोमोबाईल क्षेत्रातील मंदीने लाखो लोक बेरोजगार झाले आहेत. ग्राहकांनी वाहन खरेदीकडे पाठ फिरवल्याने नाईलाजाने कंपन्यांनाही वाहनांची निर्मिती बंद करावी लागत आहे.