अक्षय कुमारच्या ‘सूर्यवंशी’वरील ग्रहण कायम, आता ३० एप्रिलची रिलीज डेटही रद्द झाली

sooryavanshi - Maharastra Today

रोहित शेट्टीने (Rohit Shetty) प्रथमच अक्षय कुमारसोबत (Akshay Kumar) काम केले आणि यूनिव्हर्सल सोल्जर सीरीजमधील पहिला सिनेमा ‘सूर्यवंशी’ (Sooryavanshi) तयार केला. या सिनेमात कॅटरीना कैफ (Katrina Kaif) ने अक्षयच्या नायिकेची भूमिका साकारली आहे. खरे तर हा सिनेमा गेल्या वर्षी रिलीज केला जाणार होता, पण कोरोना आला आणि सिनेमाचे रिलीज पुढे ढकलण्यात आले. त्यानंतर गेल्या वर्षी थिएटर सुरु झाल्यानंतर दिवाळीत सिनेमा रिलीज करण्याची योजना आखण्यात आली. पण थिएटर पूर्ण क्षमतेने सुरु नसल्याने याचे रिलीज मे २०२१ पर्यंत पुढे ढकलण्यात आले होते. मात्र सलमानचा राधे मे महिन्यात रिलीज होणार असल्याने निर्मात्यांनी सिनेमा अगोदर म्हणजे ३० एप्रिल रोजी रिलीज करण्याची योजना आखली. वितरकांनीही सिनेमा भव्य प्रमाणात रिलीज करण्याची तयारी सुरु केली. पण महाराष्ट्र सरकारने पुन्हा ३० एप्रिलपर्यंत थिएटर बंद केल्याने सिनेमाचे रिलीज पुन्हा पुढे ढकलण्यात आले आहे. अक्षयला कोरोना झाल्यानंतर त्याच्या ‘राम सेतू’ सिनेमाच्या क्रूमधील जवळ जवळ २५-३० जणांना कोरोना झाल्याचेही समोर आले आहे. एकूणच कोरोनाने अक्षयच्या सिनेमाची आणि त्याचीही पाठ सोडलेली नाही.

रोहित शेट्टीने अगोदर अजय देवगणला (Ajay Devgan) घेऊन ‘सिंघम’चे दोन भाग आणि नंतर रणवीर सिंहला (Ranveer Singh) घेऊन ‘सिंबा’ सिनेमाची निर्मिती केली होती. या दोन सिनेमात अजय आणि रणवीरला इन्स्पेक्टर बनवल्यानंतर त्याने अक्षयकुमारला इन्स्पेक्टर बनवत ‘सूर्यवंशी’ तयार केला. या सिनेमात अजय देवगण आणि रणवीर सिंह यांच्याही भूमिका आहेत. राज्य सरकारने थिएटर बंद करण्याचा निर्णय घेतल्यानंतर रविवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackrey) आणि रोहित शेट्टी यांच्यात चर्चा झाली. राज्य सरकारचा निर्णय पाहून रोहित शेट्टीने सिनेमाचे रिलीज पुढे ढकलण्याचा निर्णय घेतल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रोहित शेट्टीचे अभिनंदन केले.

‘सूर्यवंशी’पूर्वी अमिताभ बच्चनचा ‘चेहरे’ आणि सैफ अली खानच्या ‘बंटी और बबली 2’ सिनेमाचे रिलीजही पुढे ढकलण्यात आल्याची बातमी आम्ही तुम्हाला दिलीच होती. कंगना रनौतचा थलाईवी मात्र रिलीज केला जाणार असल्याचे सांगितले जात आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button