” खाऊ आनंदे !” (भाग-5) खाऊन पिऊन उपाशी !

Calcium

हाय फ्रेंड्स ! मागील चार लेखांकामध्ये कुपोषणाची भयानक स्थिती, ग्रामीण व शहरी भागातील कुपोषणातील अंतर, जीवनशैलीचा त्यावर होणारा परिणाम आणि कुपोषणाची सुरुवात जिथून होते, तो समाजाचा सगळ्यात महत्त्वाचा घटक म्हणजे “स्त्री आणि तिचे आरोग्य ! ” .तिच्या आहाराला कधीही न मिळणारी प्राथमिकता आणि मुळातच तिची स्वतःची असणारी मानसिकता ! ह्या गोष्टी बघितल्या .

मात्र काल विचार करत असताना आणखीन एक लक्षात आलं की,” अरेच्च्या ! आर्थिक स्थिती पोषक आहे, शिक्षण पण आहे, म्हणायला शारीरिक आणि मानसिक ओढाताण ही फार नाही . हा !जीवनशैली तेवढी थोडी पाश्चिमात्य पद्धतीकडे झुकणारी आहे .परंतु इतर सगळी अनुकूलता असताना देखील तिथे कुपोषण आहे. असा काही मध्यम ते उच्च मध्यम वर्ग आहे.

म्हणजे थोडक्यात हा वर्ग” खाऊन पिऊन उपाशी “असा आहे. यांच्यातही ऍनिमिया आहे, कॅल्शियमची, डी व्हिटॅमिन ,ची कमतरता आहे .बऱ्याच लोकांना बीपी ,शुगर ,थायरॉईड ,हार्ट प्रॉब्लेम देखील आहेत. अॅलर्जी ,अस्थमा यांनी पण ते ग्रस्त आहेत ! मग सगळी अनुकूलता असताना यांना सुशिक्षित कसे म्हणावे ?असाही एक प्रश्न मनात आला .मोठ्या पदावर काम करता येणे, लिहिता वाचता येणे ,राहणीमानाची आधुनिकता, हाय-फाय हॉटेलमध्ये जेवता येणे आणि नवीन नवीन चित्रविचित्र पदार्थांची नावं माहित असणे म्हणजे सुशिक्षितपणा ?

पण बराच विचार केल्यावर लक्षात आलं कि नाही ! यामागेही बरेच काही कारण आहेत. पदार्थांच्या शिजवण्याच्या प्रक्रियेतील चुका किंवा आधुनिक साधनांचा वापर !

पदार्थ शिजवताना साधा वरण भात करायचा असेल तरीही डाळ तांदूळ थोडे आधी भिजत घातले ते त्यातील अन्न घटक वाढतात. भाज्या या नेहमी धुतल्यानंतर चिरायला हव्यात. बरेचदा लोक अजूनही ही आधी चिरतात आणि मग धुतात,त्यामुळे त्यातील सगळी जीवनसत्व वाया जातात. तसेच फळे ही बऱ्याच वेळा चिरून ठेवली तर अन्न घटक नष्ट होतात. फळांचे ज्यूस काढून पिण्यापेक्षा नुसती फळे जर खाल्ली तर त्यातील फायबर चा फायदा शरीराला मिळू शकतो. भाज्या शिजवताना झाकण न टाकता जर शीजवल्या, तर या प्रक्रियेत ही बरीच जीवनसत्वे उडून जातात. पूर्वी आपण भाज्या शिजवण्यासाठी किंवा इतर पदार्थांसाठी लोखंडी तसेच पाणी पिण्यासाठी तांब्यांच्या हनड्यांचा वापर केला जात होता. नकळत लोह आणि तांबे यांचा फायदा शरीराला होत होता. फोडणीचे तेल धुर येईस्तोवर तापू देऊ नये, तळणीचे तेल परत तळण्यासाठी वापरू नये. त्या छोट्या छोट्या गोष्टींनी बरेच फायदे होऊ शकतात.

वेगवेगळ्या यंत्रसामग्रीचा जितका उपयोग होईल तेवढी पदार्थाची चव कमी होते असं म्हणतात. कारण त्या प्रोसेस मध्ये बरेचसे अन्नघटक ही नष्ट होतात, किंवा चुकीचे अन्न घटक त्यात मिसळतात. उदाहरणार्थ वॉटर प्युरिफायर. फ्रिज मध्ये आपण कुठेही वस्तू कितीही कालावधी साठी ठेवणे योग्य नसते. फ्रिजमध्ये एकदा काढलेली वस्तू लगेच संपवावी .कारण नेहमीच्या तापमानाला सूक्ष्म जिवाणू लगेच कार्यरत होतात .जर थोडीच वापरायची असेल तर तेवढेच बाहेर काढावे.

दररोजच्या जेवणात जे अन्नपदार्थ ज्या प्रमाणात जायला हवेत, ते मोजून-मापून जेवले जात नाही कारण विविध प्रोग्राम, भिशी पार्टी ,रिसेप्शन यातून भरपूर मैदा साखर तेल तूप पोटात जात राहते. खरंतर महाराष्ट्रियन जेवण आहाराच्या दृष्टीने सर्वोत्तम म्हणता येईल.खाण्याच्या प्रमाणानुसार त्यांची वाढण्याची जागा सुद्धा निश्चित केलेली आहे.वरून मीठ घेण्याची गरज नाही हे लक्षात घेऊन नैवेद्याच्या पानात मीठ न वाढण्याची पद्धत रूढ झाली.

डायट आज प्रत्येक जण आपापल्या पद्धतीने वेगळे वेगळे करतात. त्याने वजन कमी जास्त किती होत असेल ते असो पण जीवनावश्यक सगळे अन्नघटक योग्य वेळी, योग्य प्रमाणात पोटात जात नाहीत.

सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपल्याला जे अन्नपदार्थ उपलब्धता होतात आहेत ,ते कितपत अन्न घटकांची पूर्तता करणारे आहेत ? हा खूप महत्त्वाचा विषय आहे.

आज सर्वत्र हायब्रीड असे पदार्थ मिळतात. पूर्वी गाजरे लाल मिळायची ,आता ती केशरी मिळतात. टोमॅटोचा आकारही एवढा मोठा नसायचा . आजकाल लसूण सुद्धा हायब्रिडच मिळते. तिला फारशी चव नसते. थोडक्यात मिळणाऱ्या अन्नाचा कस पूर्वीसारखा नाही.

उत्पादन वाढीसाठी रसायने आणि खतांचा केला जाणारा वापर : याचा परिणाम न कळत आपल्यावर होत राहतो.
असं वाचनात आलेले आहे की जीवनसाखळी नुसार जर आपण, पहिल्यांदा वनस्पती झाडे ,नंतर त्यावर जगणारे शाकाहारी, त्यानंतर त्यावर पोषण होतं असे मांसाहारी ! एवढयांचा जरी विचार केला, तरीही समजा ,वनस्पती किंवा वृक्ष यांच्यात जर रसायनांची मात्रा 10 युनिट असेल, तर

ती त्यांच्यावर अवलंबून असलेल्या शाकाहारी लोकांपर्यंत पोचते तेव्हा ती संख्यात्मक पद्धतीने वाढत जाते. ती 100 युनिट बनेल. आणखीन मांसाहारी लोकांमध्ये आणखीन वाढेल.

कॉम्बिनेशन हाही एक महत्वाचा मुद्दा ! उदाहरणार्थ पालक शिजवलेला एक वाटी जर पंधरा दिवस खाल्ला, तर हिमोग्लोबिन पर्सेंटेज वाढतं . परंतु लोह हे विटामिन C बरोबर जर घेतले गेले , तर त्याचा जास्त इफेक्ट होतो. तसेच B आणि C ही जीवनसत्व पाण्यामध्ये विद्राव्य आहे. म्हणून ती लवकर शोषली जातात, परंतु A ,D, K,E ही जीवनसत्व मात्र फॅटी अॅसिडस मध्येच विद्राव्य असल्याकारणाने, साजूक तुपाचा एक चमचा तरी दररोज खाण्यात आलाच पाहिजे असे म्हणतात. हीच गोष्ट कॅल्शियम बाबत! कॅल्शियम च्या भरपूर गोळ्या जरी आपण घेत असलो तरीही त्याचा शरीरासाठी उपयोग होण्यासाठी आपल्या शरीराची भरपूर हालचाल होणे आवश्यक असते .नाहीतर तर ते कॅल्शियम वापरले जात नाही आणि आपल्याला त्याचा फायदा दिसत नाही . ही सगळी उदाहरणादाखल दिलेली परंतु, अशी कॉम्बिनेशन आपण जर वाचनातून वाढवली आणि अमलात आणली ,तर त्याचा शरीराला खूप फायदा मिळेल.

फळे पिकवण्यासाठी कृत्रिम रसायनांचा वापर केला जातो. Acitilin िवा ज्याला कार्बाइड म्हणतात. त्यामुळे त्यांचा बाहेरून रंग हा एक सारखा दिसतो. केळी पिवळी धम्म दिसतात. ते खरंतर ओळखायला येतात. पण त्यासाठी आपल्या ज्ञान वाढवणे आणि एक चांगला डोळस ग्राहक बनणे गरजेचे असते.

Adulteration : आज मिळणाऱ्या जवळ जवळ सगळ्या पदार्थांमध्ये भेसळ मोठ्या प्रमाणात असते. अगदी दुधासारख्या पदार्थांमधूनही ब्लोटिंग पेपर चे तुकडे आणि काय काय, मिसळण्याच्या बातम्या आपण वारंवार ऐकत ,वाचत असतो. मिऱ्यामध्ये गुलबक्षीच्या बिया, तर तिखटामध्ये लाकडाचा भुसा. थोडक्यात “पुरिटी ऑफ सबस्टन्स “मिळतं नाही.

यासाठी आज-काल गच्चीवरील बाग किंवा परसबाग आणि त्यातून फळ भाज्या यांचे उत्पादन करण्याची ची पद्धत वाढलेली आहे ती निश्चितपणे चांगली आहे. रासायनिक खतांच्या ऐवजी कांद्याच्या सालांचे पाणी, केळीच्या सालांचे मिक्सर मधून काढलेले मिश्रण अंड्यांच्या टरफला पासून मिळणारी पोषकतत्वे जर झाडांना दिली तर घरच्या घरी वाया जाणाऱ्या गोष्टींपासून आणि हार्मलेस (विदाऊट केमिकल्स) अशी खते आपण वापरू शकतो. त्याचप्रमाणे हळदीचे पाणी आणि इतर बरीच रोगनाशके मारता येतात ,याचा अनुभव अनेकांनी घेतलेला आहे. त्याचप्रमाणे घरातल्या ओल्या  कचऱ्यापासून आणि पालापाचोळा पासून घरच्या घरी खताची निर्मिती करणारेही आज बरेच जण आहेत. शेवटी शुद्ध आणि पोषक अन्न मिळवायचे तर थोडे कष्ट घ्यावे लागतील.थोडी जागरुकता लागेल.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER