“खाऊ आनंदे !” (भाग 2)

Malnutrition

कुपोषण : ग्रामीण व शहरी भागातील असमतोल! सध्याच्या पोषण सप्ताहाच्या निमित्ताने समतोल आहार आणि कुपोषणाचा विचार करताना अनेक पैलू नजरेपुढे येऊ लागले .कुपोषणाच्या प्रकारांमुळे कोणते कुपोषण कशामुळे होते तेही आपण काल बघितले .म्हणूनच एवढासा शब्द कुपोषण मला एवढा मोठा राक्षस वाटू लागला ! मग ग्रामीण भागातील कुपोषण शहरी भागापेक्षा नक्कीच जास्त असेल का ?

बालमृत्यू व बालकांमधील कमी वजनाला ,विशेषतः अाईचे आरोग्य हा महत्त्वाचा मुद्दा ठरतो. मग आई किंवा कुठलीही स्त्री आपल्या आरोग्याची ,आहाराची किती काळजी घेते ? न घेण्यामागे तिची कुठली मानसिकता असते ?

सुशिक्षितपणाचा कुपोषणावर काही परिणाम होत असेल का ? शिक्षित होऊ- नही स्वयंपाकाच्या पद्धती बाबत बदल झालेला आहे का ?

आजचा ओबेसिटीचा प्रॉब्लेम हा फक्त शहरी भागात असावा असं वाटत होतं, कुपोषणात जीवन शैलीचा ही फार मोठा भाग आहे ना? वृद्ध व्यक्तींमध्ये कितपत डाएट कॉन्शस्नेस असतो ? असे प्रश्न फेर धरून नजरेपुढे नाचू लागले.
असे हे कुपोषण दूर करण्यासाठी सरकारी पातळीवर नक्कीच काहीतरी योजना असतील. त्याची अंमलबजावणी होते का ,त्याचे काही फायदे मिळाले आहेत का?

आणि मुख्य म्हणजे याबाबतीत आम्ही काय करू शकतो? किंवा मी स्वतः व माझ्या कुटुंबियांच्या आहारातील समतोल साधायचा प्रयत्न करायला हवा आहे. तो मी करतो / करते का?

ग्रामीण आणि शहरी भागातील कुपोषणाचा विचार करताना ग्रामीण भागातील कुपोषणाची गंभीर परिस्थिती बाबतचा अंदाज होताच.

एका सर्वेक्षणानुसार, ग्रामीण भागातील 50 टक्के मुले खुरटलेली आणि 21 टक्के जास्त उंची असूनही कमी वजनाची दिसून आली .मात्र शहरी भागाचा विचार करता 40 टक्के मुले खुरटलेली आणि 17 टक्के मुले जास्त उंची च्या मानाने कमी वजनाची दिसून आली.

या गंभीर स्वरूपाबाबत अभ्यास करण्यासाठी छत्तीस विकसनशील देशातील लोकसंख्याशास्त्रीय व आरोग्य सर्वेक्षणाचा वापर केला गेला .त्यानुसार सामाजिक व आर्थिक दृष्ट्या आयाम बघितले गेले. त्यानुसार महिलांचे शिक्षण, त्यांची स्थिती ,सुरक्षित पाणी व इतर स्वच्छतेच्या सवयी, घरगुती आर्थिक स्थिती हि कारणे पण पोषण स्थिती ठरवणारी ठरली.
या pandemic काळात अशी बरीच उदाहरणं दिसत होती. अतिशय पावसा मध्ये भरपूर पाण्यातून नदी पार करून स्त्रिया बाळंतपणासाठी जात असल्याचे फोटो येत होते. किंवा अति त्रास झाल्यावरच ते या दवाखान्यात येतात असेही वाचनात येत होते.

दुसरे ग्रामीण व शहरी कुपोषणात फरक पडण्याचे महत्त्वाचं कारण म्हणजे माताजन्मपूर्व आणि बर्थिग केअर आणि मुलांचे लसीकरण.

असे जरी असले तरीही, समान कार्यक्रम व समान धोरणात्मक चौकटी दोन्ही भागांमध्ये आखायला हव्यात! हे अलीकडे वाढत चाललेल्या शहरी कुपोषणाचे प्रमाण दाखवणाऱ्या संशोधनातून म्हणावे लागते.

कुपोषणाचे होणारे परिणाम हे गंभीर आहेतच !

*अयोग्य आहार आणि आजार यांचा खूप संबंध आहे. विटामिन्स, मिनरल्स यांच्या अभावी होणारे स्कर्व्ही, बेरीबेरी यासारखे अनेक आजार आपण अगदी लहानपणापासून शिकत आलेलो आहोत. परंतु एकूणच वेगवेगळ्या कमतरता मुळे ,कुठलेही इन्फेक्शन असेल तर त्याला बळी पडण्याची शक्यता खूप वाढते. प्रतिकार क्षमतेवर याचा परिणाम होतो . त्यामुळे साथीच्या आजारात असे लोक जास्त बळी पडतात. korona मध्ये म्हणूनच इम्युनिटी वाढवणारी औषधे काढे घेण्यात येत आहेत.

*मेंदूतील न्यूरॉन्स वर परिणाम होऊन वाचादोष ,स्मरणशक्ती ,हालचाली मधील समन्वय, को-ऑर्डिनेशन यांच्यावर परिणाम होतो .तसेच शरीरातील पाण्याची , द्रव्यांची कमतरता (इलेक्ट्रो लेट्स) यामुळे किडनी वर ताण पडून तिची कार्यक्षमता कमी होते.

*85 टक्के भारतीय मुले साधारण दहा सात ते बारा वयोगटातील लोह फॉलिक ऍसिड विटामिन ए यांची कमतरता असणारे आहेत. ज्याचा परिणाम सरळ-सरळ त्याच्या कॉगनेटिव्ह डेवलपमेंट वर , आकलन शक्तीवर होत असतो.

*एकूणच मुलांच्या वाढीच्या अवस्थेत त्यांचा योग्य मानसिक विकास होणे आवश्यक असते. तो विकास आहारावर अवलंबून असतो. समतोल आहार अभावी शिक्षणात अडचणी येऊ शकतात ,ती मुले शैक्षणिक दृष्ट्या मागे पडू शकतात .त्यांच्यात अनेक लर्निंग डिसेबिलिटी येऊ शकतात. कुपोषण हा आजार नाही .तर ती एक स्थिती आहे.

* त्यामुळे त्याच्यावर औषध नाही .तर केवळ त्याचा प्रतिकार करणे म्हणजे कुपोषण होऊच न देणे , त्यासाठी प्रयत्न करणे, म्हणजेच खाण्यामध्ये बदल करून जेवणातील आवश्यक सगळी पोषक द्रव्ये ,संतुलित स्वरूपात घेणे हाच त्याच्यावर योग्य उपाय आहे.

*मुलांना आणि पालकांना याबाबतीत जागरूक करणे ही खूप मोठी जबाबदारी आहे. बरेचदा डायरिया सारख्या आजारात मुलांना भरपूर प्रमाणात द्रवपदार्थ पोटात जाणे आणि व्यवस्थित आहार मिळणे आवश्यक असते .परंतु पुरेशा माहिती अभावी जवळजवळ दहा पैकी चार माता मुलांना जेवण देत नाहीत, त्याने त्रास जास्त होईल असे त्यांना वाटत असते. त्यामुळे डीहायड्रेशन चे प्रमाण वाढते. असेच अनेक गैरसमज शहरी भागातही आहेत. लिंबू खाल्ल्याने सर्दी होते, वरण खाल्ले की ऍसिडिटी होते. वगैरे!

*सरकारी योजना भारतात तेरा हजार करोड रुपये” मिड डे मील “(MDM) या योजनेसाठी मंजूर केले . याचा लाभ पहिली ते आठवी वर्गातील सरकारी व सरकारी अनुदानातील बारा लाख शाळांमधल्या दहा करोड मुलांना होणे अपेक्षित आहे,
यात विचारपूर्वक प्रत्येकाला अंदाजे साडेचारशे ते सातशे कॅलरीज आणि 12 ते 20 ग्रॅम प्रोटीन याप्रमाणे प्रायमरी आणि त्यापुढील मुलांसाठी योजना केली होती. परंतु या सुविधेचा वापर होण्यातही बऱ्याच अडचणी आल्या. स्वच्छतेचा अभाव, दूषित पाणी ,ग्लोव्हज चा वापर न करणे, ठरवलेल्या दररोजच्या मेन्यू चे उल्लंघन, यामुळे या योजनेला फार यश मिळत नाही .

*बालक अधिकार संरक्षण संस्थेअंतर्गत “सेव द चिल्ड्रेन”या योजनेने मात्र विविध एनजीओतील लोकांना प्रशिक्षण देऊन जनजागृती प्रोग्राम हाती घेतली गेली.त्याच्यात पाणी, सनिटेशन हायजिन( WASH) यावर भर होता. 2006 ते 2014 मध्ये अतिशय नाट्यमय रिझल्ट यांना मिळाले. केरळ ,तामिळनाडू ,हिमाचल प्रदेश त्यांनी हे यश मिळवले. त्यानुसार कुपोषित ,वाढ खुंटलेल्या मुलांनचे प्रमाण 48 टक्के यावरून 39 टक्क्यावर गेले .ही नक्कीच खूप मोठी अचिव्हमेंट आहे.
एकूणच शहरी व ग्रामीण भागातील कुपोषणाचा विचार करताना ग्रामीण भागातील प्रदूषणाचा अभाव, ताजा भाजीपाला, रोजच्या धावपळीच्या तणाव नसणे या ग्रामीण भागातील खरेतर जमेच्या बाजू! परंतु स्त्रियांचे शिक्षण, त्यांचे समाजातील स्थान ,गरीबी ,शेतीवर अवलंबून असलेले जीवन, आणि त्यामुळे येणारा ताण यामुळे ग्रामीण भागात कुपोषणाचे प्रमाण जास्त आहे.

म्हणूनच तेथे सगळ्यात जास्त गरज ही जाणीव जागृतीची आहे . हे लक्षात घेऊनच आपले पंतप्रधान मा. श्री. नरेंद्र मोदीजींनी हा पोषण सप्ताह जाहीर केला.

यानिमित्ताने मला, माझी आहाराची पद्धत ,माझी तब्येत ,त्यातील अडचणी, त्यासाठी आवश्यक समतोल आहार, जेवणाच्या वेळा ,जिभेवरचा ताबा, व्यायाम याकडे डोळसपणे बघता येईल का? सुदैवाने हा महिना “अधिक महिना” आला आहे. त्याचा नेमच आपण” संतुलित जीवनशैली” ठरवला तर सोन्याहून पिवळे !

मानसी फडके
एम.ए.मराठी.
एम एस काऊंसेलिग सायको थेरपी.
एम ए सायकॉलॉजी.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER