खा. धैर्यशील माने यांची शिवसेना प्रवक्तेपदी निवड

Dhairyasheel Sambhajirao Mane

मुंबई : कोल्हापूरचे खासदार धैर्यशील माने (Dhairyasheel Sambhajirao Mane) यांची शिवसेन प्रवक्तेपदी निवड करण्यात आली. लाेकसभा निवडणुकीत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राजू शेट्टी यांचा पराभव धैर्यशील माने यांनी केला होता. कोल्हपुरातील प्रचार सभेत पक्षाध्यक्ष उध्दव ठाकरे धैर्यशील माने यांच्या वक्तृत्वावर खूष झाले होते. जिल्हापरिषद सदस्य ते खासदार असा प्रवास माने यांनी केला आहे. अत्यंत ओघवत्या भाषेत प्रभावी वक्तृत्वासाठी धैर्यशील माने प्रसिध्द आहेत. पाच वर्षे त्यांनी जिल्हापरिषदेचे उपाध्यक्षपद सांभाळले होते. त्यांचे आजोबा बाळासाहेब माने सुमारे २५ वर्षे खासदार होते. त्यांच्या मातोश्री निवेदीता माने यांनीही दोनवेळा राष्ट्रवादी काँग्रेसमधून लोकसभा निवडणूक जिंकली होती. मोठा राजकीय वारसा असलेल्या धैर्यशील माने हे कोल्हापुरात युवा वर्गात विशेष लोकप्रिय आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER