खा. संभाजीराजे यांच्या प्रयत्नातून कोल्हापूरला ऑक्सिजनचा मुबलक पुरवठा

Sambhaji Raje Chhatrapati

कोल्हापूर : खासदार संभाजीराजे छत्रपती (Sambhaji Raje Chhatrapati) यांनी 9 सप्टेंबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा बैठक घेतली होती. त्यामध्ये ऑक्सिजन वायूचा तुटवडा भासत असल्याचे जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी सांगितले होते.

कोल्हापूरसाठी (20 के एल प्रतिदिवस) ऑक्सिजन गॅस ची आवश्यकता असून तशी व्यवस्था करण्यात यावी ही मागणी या बैठकीत जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी केली होती.

महाराष्ट्रभर ऑक्सिजन गॅसची कमतरता भासत असल्याचे माझ्या लक्षात आले. त्यानुसार या पाठपुरावा केला. खा. संभाजीराजे यांनी केलेल्या प्रयत्नांना यश येऊन आवश्यक तो ऑक्सिजन गॅस उपलब्ध झाला आहे. रायगड येथील ‘जे एस डब्ल्य’ या उत्पादक कंपनीशी खा. संभाजीराजे यांनी चर्चा केली. कंपनीने आवश्यक तेवढे गॅस पुरवठा करण्याचे मान्य केले आहे.

जिल्हा प्रशासनाने त्या कंपनी सोबत लवकरात लवकर करार करून ‘आँक्सिजन वायू’ कोल्हापूरात आणण्याची व्यवस्था करावी. यापुढेही कोल्हापूरमधील कॉरोना रुग्णांसाठी लागेल ती मदत करण्यास तत्पर असू, असे खा. संभाजीराजे यांनी यावेळी सांगितले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER