पश्चिम महाराष्ट्राला भूकंपाचा धक्का

सातारा: पश्चिम महाराष्ट्रासह कोकणाला भूकंपाचा सौम्य धक्का बसला. भूकंपाची तीव्रता ४.8 रिश्टर स्केल एवढी होती. रात्री १० वाजून २५ मिनिटांनी भूकंपाचे धक्के बसले. कोल्हापूर, सातारा, सांगली जिल्ह्यात भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले. भूकंपानंतर कोल्हापूर आणि सातारा जिल्ह्यातील सर्व धरणं सुरक्षित असल्याची माहिती देण्यात आली आहे. सातारा येथील कोयनानगर भूकंपाचा केंद्र होते. कोकण पट्टयातील सिंधुदुर्ग, रत्नागिरीतही भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले.