मुंबई परिसरात भूकंपाचे धक्के; डहाणू, तलासरीत जाणवले धक्के

Earthquake - Mumbai

मुंबई : मुंबई (Mumbai) परिसरात भूकंपाचे (Earthquake) सौम्य धक्के बसले आहेत. पालघरनंतर आता मुंबई आणि नाशिकमध्ये (Nashik) भूकंपाचे धक्के बसल्याची माहिती मिळत आहे. मुंबईत तर २४ तासांत दोन वेळा भूकंपाचे धक्के बसल्याची माहिती मिळाली आहे. गेल्या काही महिन्यांपासून संपूर्ण देश कोरोनाच्या संकटाचा सामना करत आहे. विशेष म्हणजे या कोरोनाच्या संकटात अनेक देशांना भूकंपाचा सामनाही करावा लागत आहे.

राज्यातील बऱ्याच भागात भूकंपाचे धक्के जाणवल्यामुळे लोकांमध्ये भीतीचं वातावरण आहे. महाराष्ट्रातील उत्तर मुंबईतही भूकंपाचे धक्के जाणवले आहेत. भूकंपाचे हे धक्के सौम्य होते. त्यात कोणतीही वित्तहानी झालेली नाही. उत्तर मुंबईपासून ९८ किमीअंतरावर या भूकंपाचं केंद्रबिंदू असून, त्याची तीव्रता २.७ मॅग्निट्युट असल्याची माहिती आहे. आज सकाळी ६.३६ वाजता हे भूकंपाचे धक्के जाणवल्याची माहिती मिळाली आहे.

तर दुसरीकडे, नाशिक जिल्ह्यात रात्री उशिरा भूकंपाचे धक्के बसले. ४ रिश्टर स्केल या भूकंपाची तीव्रता होती . शुक्रवारी मध्यरात्री ११.४१ च्या सुमारास भूकंप झाला. यात कोणत्याही जीवित किंवा मालमत्तेचे नुकसान झाल्याची माहिती अजून समोर आली नाही. नॅशनल सेंटर फॉर सिस्मोलॉजीने भूकंपाची माहिती दिली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER