वसुंधरेचे आम्ही विश्वस्त (भाग 2)

कालच एका मैत्रिणीच्या घरी गेले होते. नुकतच पाणी येऊन गेले होते. मैत्रीण हात पुसतच बाहेर आ ली. अजूनही पाचव्या दिवशी पाणी येतं त्यामुळे खूप भरून ठेवाव लागत असं सांगत होती. परंतु मी घरात शिरले तेव्हा त्यांच्याच कॉलनीतला पाईप फुटून भरगच्च पाणी वाहत असताना दिसले. कसेतरी ते ओलांडून घरात शिरले होते. त्याबाबत मैत्रिणीला विचारल्यावर ती म्हणाली, अग कुणीच पुढाकार घेत नाही. आणि आपण कुठे तक्रार करायची ? कुठे अर्ज करायचा हेही समजत नाही. साफसफाईला येणारे लोक उडवाउडवीची उत्तरे देतात. आणि घरासमोर कचरा टाकला, झाड पाल्यांचा तर उचलूनही नेतं नाही, त्यामुळे खुप डास वगैरे होतात. आणि आपल्या घरातल्या झाडांचा फांद्यांचा कचरा समोर टाकू नये हे कळतं पण त्यासाठी पर्यायी व्यवस्था काय आहे ? हे मात्र कोणीच सांगत नाही. मुळातच माझ्या कॉलनीमध्ये भरपूर झाडे आहेत. तू बघतेय ! आजूबाजूने किती छान गार्डन आहे. पण त्यामुळे कायमच कुठल्या ना कुठल्या झाडाची छाटणी करावी लागते. मग हे सगळं कुठे टाकायचं हा मोठाच प्रश्न माझ्यासमोर नेहमीच असतो.

ही बातमी पण वाचा:- वसुंधरेचे आम्ही विश्वस्त ! ( भाग १)

फ्रेंड्स ! बरेचदा असंच” कळतं पण वळत नाही “ही परिस्थिती असते .त्याला अनेक गोष्टी जबाबदार असतात. आणि अशा कामांना सुरुवात कुठून करावी? असाही प्रश्न प्रत्येकाला पडतो. त्यामुळे मला असं वाटतं की पुढाकार हा प्रत्येकाने घ्यावा. चांगल्याची सुरुवात स्वतःपासूनच करावी. “माझा कचरा हो ssमाझी जबाबदारी .”हे गाणं फक्त कचरा गाडी आली, एवढं समजण्यापुरतच नको.

काय करता येईल ?

 • *अनेक भिशी ग्रुप किंवा महिला मंडळे किंवा सोशल वर्क करणारे ग्रुप्स खूप निर्माण झालेत आणि त्यांना सतत करता येतील अशी कामे पण भरपूर आहेत.
 • *जेव्हा पाणी येत ,त्या वेळी बऱ्याच ठिकाणी पाईपलाईन विविध कारणांनी फुटलेली असते. पाणी वाया जात असते आणि कामवाल्या बायका वाहत्या पाण्यामध्ये भांडी धुणी करत असतात. नळाची धार पूर्ण सोडलेली असते. धुणीभांडी यांच्या पाण्यावर पूर्वी अळू सारखी झाडे वाढत असत .तांदूळ, डाळी, भाज्या धुण्याच पाणी आपण आता झाडांना घालू शकतो.
 • *प्रत्येक घरातून निघणारा कचरा हा मोठ्या प्रमाणात भाज्यांची डेख, सालं ,बियांचा असतो .त्याचे कंपोस्ट आज प्रत्येकाने बनवायला हवे. जागा दिसेल सोयीची त्याप्रमाणे मोठे वृक्ष लावणार आहे तर आहेच. त्यासाठी वाढदिवस, लग्नाचे वाढदिवस हे झाड लावून व जगवूनच प्रत्येकाने साजरे करावे .किंवा लग्न समारंभ, आला गेला ,सगळ्यांना गिफ्ट,भेट देण्यास वा हळदीकुंकवाचे वाण सुद्धा रोपे च द्यावी. हाय एक सर्वमान्य पायंडा पडला पाहिजे तसेही आज कुणा जवळच कशाचीच कमी नसते.
 • *मध्यंतरी “झाडांची भिशी “ही कल्पना वाचली ती पण उत्तमच.
 • *आजकाल उत्पन्न जास्त निघावा म्हणून रसायनांचा बेभान वापर होतो .फळ, भाज्या फ्रेश दिसतात. पण त्या” सायलेंट किलर” ठरतात. हे फार भयंकर सत्य आहे .यासाठी ऋजुता दिवेकर यांनी सांगितलेला उपाय मला आवडला. आपले फॅमिली डॉक्टर असतात. तसे फॅमिली चा एखादा कायमस्वरूपी सेंद्रीय शेती करणारा, खात्रीने रसायनांचा वापर करणार नाही असा बागायतदार ठरवावा ,त्याच्या कडूनच भाजी घ्यावी.
 • *निर्माल्य नदीमध्ये विसर्जित करण्याची पद्धत पूर्ण बंद करावी .फुले पत्री झाडांच्या मुळांशी घालता येईल व इतर तुटक्या फ्रेंमस वगैरे मधील फोटो काढून घेऊन फ्रेंम्स टाकून द्याव्यात.
 • *ओला व सुका वेगवेगळ्या कचरा करताना त्रास नक्की होतो .पण तेवढाही वेळ सगळ्यांनाच नसतो असे नाही. घरातील ज्यांना शक्य आहे त्यांनी ती जबाबदारी घ्यावी आणि घंटागाडी वाल्याला पण तो वेगळाच ठेवण्याचा हट्ट धरावा.
 • *घरातील प्लास्टिक बॅग वर्षाअखेरीस घरातून हद्दपार करव्यात . बाहेर जातांना वापरायच्या दोन कापडी ,चार-पाच कागदी पिशव्या आपल्या गाडीच्या डिकीत ठेवणे कठीण नाही. प्लास्टिकच्या भांड्यांचा वापर, ओले पदार्थ किंवा आंबट पदार्थ ठेवण्यासाठी किंवा ओव्हनमध्ये गरम करण्यासाठी वापरू नये.
 • *घरातला गॅस वापरताना सुद्धा बऱ्याच छोट्या गोष्टी गॅस वाचवत असतात .
  त्यात थोडाही लिंक होत नाही ते तपासावे प्रेशर कुकरमध्ये डाळ तांदूळ जरा आधी धुऊन ठेवून वापरले तर शिजायला कमी वेळ लागतो तसेच एक सुट्टी व्हायच्या वेळी केस लहान केला तर या पद्धतीने दहा मिनिटात छान दिसते एकच वेळ कुठली भाजी वा कडधान्य वापरायचे आहे का याचा विचार करावा पाणी तापवायला सोलर चा वापर फार महत्त्वाचा ठरतो. सोलर चेच दिवे आपल्याकडच्या उन्हाळ्यासाठी उपयोगाचे ठरतात.
 • *आज सगळ्यांकडे स्वतःचा टू व्हीलर आणि फोर व्हीलर आहेतच याचा अर्थ असा नाही त्या वापरल्याच पाहिजे. मुळात तर जवळच जायचे असेल तर पायी जाणे सर्वोत्तम आणि दूर जातांना सार्वजनिक वाहने वापरायला हवी .गाड्या वापरताना गाडीची सर्विसिंग व पीयूसी सर्टिफिकेट आवश्यक असते ते घेण्याची तसदी कोणी दाखवत नाही.
 • *आज शब्दाचा अनिर्बंध वापर बघताना खूप वाईट वाटतं शाळांमधून पैसे आकारून भरपूर पुस्तकांबरोबर वह्या पुरवल्या जातात त्या पूर्ण भरलेला जाताच दुसऱ्याही मिळतात आणि मुलांना रिकामी पाने काढून रही करण्याची आज गरज नाही आणि महत्त्वही वाटत नाही जास्तीत जास्त पाठ कोरे कागद वापरणे वाया जाऊ न देणे खूप आवश्यक आहे.
 • *आवाजाचे प्रदूषण हे आज कुणाला कदाचित जाणवत नाही .मोठा आवाज नसला तर सेलिब्रेशन होत नाही .DJ च्या आवाजाने अक्षरशहा दारं-खिडक्या हादरतात तरी आवाज वाढवण्यास सतत DJ ला आईची शपथ घालून ,आवाजाचे प्रदूषण वाढवण्याची शपथ घेतली जाते की काय ? माहित नाही खरंतर सनईचे सूर खूप गोड आणि प्रसन्न असतात.
  पूर्वी आपल्या घरातला आवाज दुसऱ्यांकडे जाऊ नये म्हणून लोक खबरदारी घ्यायचे आजच्या सोशल मीडियाच्या माध्यमातून वैयक्तिक आयुष्यात प्रदूषित झालय . मग माता वळणाची काय कथा !
 • *गणपती हरतालिका यासाठी घरातल्या धातूंच्या मूर्तींचा वापर सुरू करा नंतर ते विना उपयोगाच्या इकडेतिकडे पडणे अक्षरश: फुलांची नासाडी असते ती !
 • *आपल्या प्रत्येक सणाचे महात्म्य व त्यामागील उद्देश लक्षात घेऊनच सण साजरे करावेत. ते सर्व कृतज्ञता व्यक्त करणारे ,आठवण ठेवणारे आणि काही एक मूल्य सांगणारे तसेच सामाजिकता हवा व सर्वत्र डेकोरेशन करताना थर्माकोलचा वापर टाळावा. किंवा सुशोभीकरणासाठी घरातील कचऱ्याचा वापर करून त्यातून कला निर्माण करावी. फ्रीज च्या सुद्धा पिशव्या विदाऊट प्लास्टिक निघाल्या आहेत त्यांचा वापर करावा .
 • *पॉल्युशन मुक्त साहित्याचा वापर करून घर बांधण्याची कल्पना पेपरला मध्यंतरी वाचली. एवढेच काय तर प्लास्टिकचा, रस्ते बांधणी साठी करण्याचे पण ऐकले आहे. सजगतेने बघितल्यास अशी उत्तरे मिळत जातात.
 • *खाण्याच्या पदार्थात अजिनोमोटो इतर रंग व इतर गोष्टींचा वापर शरीराला हानिकारक असतो तो टाळायला पाहिजे. त्याचप्रमाणे होळीच्या वेळी नैसर्गिक रंगांचा वापर वाढवावा. काही ठिकाणी फुलांची गरज असणे योग्य. पण उगीच बुके गिफ्ट देणे आणि जीवनाचा विकास घडवून,दररोज चार कोटींचा तोचतोचपणा घालवणारे आहेत फक्त हा सर्व अर्थ लक्षात घेऊन त्याला नवीन काळानुरूप रूप द्यायला हवे. उदाहरणार्थ जसे की होली. यामधील सर्व दुष्ट प्रवृत्तींचा नाश घडवणे टाकणे हा उद्देश असतो. मग लाकडे तोडून जाळण्यास मतलब च काय ? असा विचार प्रत्येक सणाचा करता येईल.

निसर्ग मुक्त हस्ते उधळण करतोय ,आपण मात्र त्याच्याकडून हावरटासारखे ओरबाडतोय. “देणार्याने देत जावे घेणाऱ्याने घेत जावे” एवढ्यावरच आपण थांबतो ! पण पुढे” घेता घेता एक दिवस देणाऱ्याचे हात घ्यावे !”हे मात्र आपण पार विसरून जातो. म्हणजेच समोरच्याने दिलेले घेतानाच, देणाऱ्याचे हात म्हणजे त्याचे दातृत्व, मोठ मन ,मोठ्या हाताने देणे ,याशिवाय स्वतःला वसुंधरेचे विश्वस्त तरी कसे म्हणावणार ?

फ्रेंड्स ! जगाच्या कानाकोपऱ्यात मध्ये खरंतर निसर्गप्रेमी आणि निसर्गाशी तादात्म्य पावलेले, संशोधन करणारे ,निसर्गाची जोपासना करणारे ,अनेक लोकही आपल्याला भेटतात, आपल्या वाचनात येतात, कुठून तरी माहिती कळते. पण फक्त त्यांचं कौतुक करून थांबल्याने फार काही साधायचे नाही. उलट त्यांच्या प्रयत्नातून आपल्यापैकी प्रत्येकाला जर काहीतरी दिशा मिळू शकली ? काय करू शकतो आपण याबाबत या संबंधित काहीतरी उपाय सापडले? तर मला असं वाटतं कि अशांची भेट ,ओळख खऱ्या अर्थाने कारणी लागले. बघूया जगभर लोक निसर्ग संवर्धनासाठी काय काय करतात आहेत ते?

मानसी गिरीश फडके.
समुपदेशन व सायकोथेरपिस्ट.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER