कर्णवेधन संस्कार

आयुर्वेद (Ayurveda) ग्रंथात काही संस्कारदेखील वर्णन आले आहे. आयुर्वेद हे आरोग्यशास्त्र आहे त्यामुळे आरोग्य चांगले राहण्याकरीता जे गरजेचे आहे त्या विषयाचे विस्तृत वर्णन आयुर्वेद ग्रंथांमधे आढळते. बाळांवर होणारे अन्नप्राशन संस्कार, कर्णवेधन संस्कार याविषयीचे वर्णन आले आहे. कर्णवेधन संस्कार म्हणजेच कान टोचणे. कान टोचण्याचा आरोग्याशी काय संबंध हा प्रश्न नक्कीच पडला असेल. कर्णवेधन संस्काराचे वर्णन चरक सुश्रुत वाग्भट काश्यप संहितेत आले आहे.

रक्षाभूषणनिमित्तं बालस्य कर्णौ विध्येते ।

बाळांचे दोन्ही कान २ कारणांकरीता वेधन केले जाते. एक म्हणजे रक्षा आणि दुसरे कारण अर्थात आभूषण घालण्याकरीता. वृद्धि रोग न होण्याकरीता कान टोचणे महत्त्वाचे आहे. केवळ मुलींचेच नाही तर मुलांचे देखील कान टोचावे. कर्णवेधन संस्कार सहा सात अथवा आठ महिन्यात करावा. हा मुख्यतः शीत ऋतुत करावा. थंड ऋतुत सांगण्याचा मुख्य उद्देश की छिद्रात पूय पाक निर्माण होऊ नये. छिद्र लवकर भरून येते. कर्णपाळीच्या मधोमध एक पातळ छिद्र असते तिथेच वेध घ्यावा असे सांगितले आहे. या स्थानावर शिरा धमनी नाडी नसते तसेच तरुणास्थि पण नसते. याला दैवकृत छिद्र असेही म्हटले आहे. योग्य तिथी नक्षत्र बघून हे कर्णवेधन संस्कार करावे. या दैवकृत छिद्रावर वेधन केल्यास पीडा शूल लालीमा होत नाही. म्हणूनच योग्य जागी छेद घेणे गरजेचे आहे. वेधन केल्यावर तूप वा तेलाने भिजलेला धागा घालून गाठ मारावे. दररोज तेल लावत राहावे दर 3 दिवसांनी धागा थोडा जाड करून बदलावा. जेणेकरून छिद्र बंद व बारीक होत नाही. कर्णपाळी तेलाने नरम राहते. व्रण भरून येतो. कर्णवेध संस्कार यावर एक रिसर्च पेपरनुसार कान टोचल्यावर त्या जागी झालेल्या छिद्रामुळे रोगप्रतिकार शक्ति उत्तेजित होते. अॅक्यूपंक्चर चिकित्सा या ठिकाणी होत असते. wjpmr,ijapr या मेडीकल रिसर्च जर्नलमधे यावर रिसर्च लेख आहेत. यावरून लक्षात येते की ज्या परंपरा म्हणून आपण पाळतो त्यामागे आपल्या आचार्यांनी खूप खोल शास्त्रयुक्त विचार केलेला आहे.

ह्या बातम्या पण वाचा :

 

ayurveda

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button