डीवायएसपी सुरज गुरव यांना मुश्रीफ यांच्याशी वाद पडला महागात

Hassan Mushrif-Suraj Gurav.jpg

सातारा : कोल्हापूरात तीन वर्षापूर्वी महापौर निवडीवेळी तत्कालीन आमदार हसन मुश्रीफ (Hassan Mushrif) यांच्याशी महापालिकेच्या (BMC) दारात डीवायएसपी सुरज गुरव यांचा वाद झाला होता. तुम्हाला भाजपने (bjp) पाठवल आहे अशी टिप्पणी करणाऱ्या हसन मुश्रीफ यांना सुरज गुरव यांनी त्याच स्टाईलने उत्तर दिले होते. मी लाचार नाही, काहीही बोलाल तर खपवून घेणार नाही, असा पलटवार केला होता. यानंतर गुरव यांची तडकाफडकी चिपळूणला बदली झाली होती. मुश्रीफ आणि गुरव यांच्यातील वाद खूपच गाजला. या वादाचा परिणाम म्हणून सत्ता येताच मुश्रीफ यांनी कराड हून थेट नागपूर शहर येथे डीवायएसपी सुरज गुरव यांची बदली केल्याची चर्चा आहे. वर्षातच गुरव यांची बदली झाल्याने उलटसुलट चर्चा रंगली आहे.

गुंडांमध्ये वचक निर्माण करणाऱ्या सिंघम स्टाईल पोलिस उपअधीक्षक सुरज गुरव यांची वर्षातच तिसऱ्यांदा तडकाफडकी बदली झाली. त्याला राजकीय वादाची झालर आहे. ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्याशी झालेला वादाचे पडघम आत्ताच्या बदली मागे ही आहेत. कार्यकाल पूर्ण होण्यापूर्वीच बदली केल्याने सुरज गुरव मॅटमध्ये गेल्याची चर्चा आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाMT LIKE OUR PAGE FOOTER