माझगाव जीएसटी भवन आग : उपमुख्यमंत्री अजित पवार बैठक सोडून पोहचले घटनास्थळी

Ajit pawar- mazgaon-gst-building

मुंबई :- मुंबईच्या माझगाव येथील जीएसटी भवनाला भीषण आग लागली आहे. आगीची माहिती मिळताच उपमुख्यमंत्री अजित पवार बैठक सोडून घटनास्थळी दाखल झाले आहेत.

आग नियंत्रणात आणण्याकरिता अग्निशमन दलाच्या १६ गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. आगीवर नियंत्रण मिळवण्याचे काम शर्थीने सुरू आहे. आगीमुळे धुराचे मोठे लोळ परिसरात पसरले आहेत. आगीचे कारण अद्याप अस्पष्ट आहे.

ही बातमी पण वाचा : जीएसटी भवन आग ; सरकारला कोणतीही झळ बसणार नाही : अजित पवार  

ही आग लेव्हल-३ ची असल्याची माहिती अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे. जीएसटी भवनाच्या बाजूला अनेक सरकारी कार्यालये आहेत. आग आटोक्यात यावी यासाठी प्रचंड प्रयत्न सुरू आहेत. ही आग जीएसटी भवनाच्या आठव्या मजल्यावर लागली असल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे.

जीएसटी भवनात मोठ्या प्रमाणात कागदपत्रे आहेत. आगीत महत्त्वाची कागदपत्रे जळून खाक झाल्याची भीती वर्तवली जात आहे. इमारतीत फर्निचर आणि लाकडी सामानही भरपूर असल्यामुळे आग वाढत आहे.  दरम्यान, जीएसटी भवनात कुणीही अडकले नसल्याची माहिती मिळत आहे. त्यामुळे सुदैवाने प्राणहानी टळली आहे.

माझगावच्या जीएसटी भवनाला भीषण आग