दिवसभर एमपीएससी परीक्षेचा घोळ रात्री मुख्यमंत्र्यांची सारवासारव

During the day, the MPSC exam was held at night and the Chief Minister was in charge- Maharashtra Today

मुंबई :  महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाची 14 मार्च रोजी होणारी  परीक्षा (MPSC exam) रद्द करून राज्य सरकारने आणि एमपीएससीने राज्यभरातील विद्यार्थ्यांना जबर धक्का दिला. परीक्षा रद्द केल्याचा केल्याचे तीव्र पडसाद राज्यभरात उमटले.

कोरोनाचे संकट वाढत असतानाही सरकारविरुद्ध आक्रोश व्यक्त करण्यासाठी हजारो विद्यार्थी रस्त्यावर उतरले.आंदोलने करण्यात आली. शेवटी रात्री साडेआठ वाजता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray)यांनी राज्यातील जनतेसमोर येऊन ही परीक्षा येत्या आठ दिवसांत घेण्यात येईल अशी घोषणा केली, पण या निमित्ताने राज्य सरकारची लाज मात्र गेली

एमपीएससीची परीक्षा येत्या आठवड्यात निश्चितपणे घेण्यात येईल हे माझे वचन आहे.या परीक्षेची तारीख शुक्रवारी जाहीर केली जाईल, असे ठाकरे यांनी  सांगितले. रद्द केलेली परीक्षा आठ दिवसातच घ्यायची होती तर मग ती रद्द का केली असा प्रश्न उपस्थित झाला. त्याचे समाधानकारक उत्तर मुख्यमंत्री देऊ शकले नाहीत.महसूल व इतर विभागाचे कर्मचारी परीक्षेच्या कामात असतात. पेपर वाटणे, नंबर बघून देणे, पेपर गोळा करणे, सुपरव्हिजन यासाठी कर्मचारी वर्ग लागतो. या कर्मचाऱ्यांची कोरोना चाचणी झाली आहे का, ती निगेटिव्ह आहे का हे बघावे लागेल. कोरोना लस घेतलेलेच कर्मचारी परीक्षेच्या कामात असावेत अशा माझ्या सूचना आहेत. म्हणजे विद्यार्थी दडपणाखाली राहणार नाहीत, असे मुख्यमंत्री म्हणाले. राज्यात कुराणाचे संकट वाढत आहे एमपीएससीची परीक्षा काही महिन्यांपूर्वी जाहीर करण्यात आली होती सध्याच्या परिस्थितीचा एकूणच विचार करून परीक्षेचे नियोजन करायला हवे होते परीक्षेसाठी होणारी गर्दी कशी टाळता येईल. सोशल डिस्टंसिंग कसे ठेवता येईल या सगळ्या गोष्टी विचारात घेऊन नियोजन केले जाण्याची अपेक्षा होती मात्र ते करण्याऐवजी एमपीएससीने परीक्षा रद्द करून टाकली.

मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार (Vijay Vadettiwar) यांनी ही परीक्षा रद्द केल्याचा निर्णय सरकारला माहितीच नाही अशी प्रतिक्रिया दुपारी दिली. त्यामुळे गोंधळात आणखीच भर पडली. वडेट्टीवार यांच्या विधानानंतर काही मिनिटातच राज्य सरकारने एमपीएससीला पत्र लिहून परीक्षा पुढे ढकलण्याची विनंती केली होती ही बाब समोर आली. त्यामुळे वडेट्टीवार यांचे पुरते हसून झाले.

रात्री राज्यातील जनतेशी संवाद साधताना मुख्यमंत्री म्हणाले की परीक्षा गेल्यावर्षी दिवाळीपूर्वी  होणार होती. मात्र ती त्यावेळी पुढे ढकलण्याचा निर्णय शासनाने घेतला होता. त्याच वेळी आता पुन्हा परीक्षा पुढे ढकलली जाणार नाही असे मी स्पष्ट केले होते. त्यानुसार १४ मार्च ही तारीख जाहीर करण्यात आली होती. मग आता काय झाले की ही परीक्षा पुढे ढकलावी लागली. विद्यार्थी परीक्षेसाठी परिश्रम घेत आहेत.  त्यांच्या भावनांशी मी सहमत आहे. आता १४ मार्चची तारीख दोन-तीन महिन्यांसाठी पुढे ढकललेली नाही. मी आजच राज्याचे मुख्य सचिव तसेच एमपीएससीला सूचना दिलेल्या आहेत की परीक्षेच्या तारखांचा घोळ संपवा. उद्या परीक्षेची तारीख जाहीर करा. ही तारीख येत्या आठ दिवसातील असेल.  कोणी भडकवते म्हणून भडकून जाऊ नका असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी केले. मात्र परीक्षा रद्द करण्याचा निर्णयाविरुद्ध दिवसभरात विद्यार्थ्यांनी जो तीव्र संताप व्यक्त केला त्याची दखल घेऊन मुख्यमंत्र्यांना फेसबुक लाईव्हद्वारे राज्यातील जनतेसमोर यावे लागेल हे स्पष्टच आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER