राज्यात दिवसभरात ३६ हजार ९०२ करोनाबाधित वाढले, ११२ रूग्णांचा मृत्यू

Maharashtra Coronavirus

मुंबई : राज्यातील करोना (Corona) संसर्ग आता दिवसेंदिवस अधिकच झपाट्याने वाढत आहे. दररोज मोठ्या संख्येने नवीन करोनाबाधित आढळून येत असून, रूग्णांच्या मृत्यूंच्या संख्येतही मोठी भर पडत आहे. या पार्श्वभूमीवर आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यात येत्या रविवारपासून रात्रीची जमाबंदी लागू करण्याचा निर्णय आज घेतला आहे. तर, वाढत्या संसर्गाला रोखण्यासाठी काही कडक उपाययोजना लागू करणे आणि त्याची प्रभावी अंमलबजावणी देखील केली जात आहे. दरम्यान, आज दिवसभरात राज्यात ३६ हजार ९०२ नवीन करोनाबाधित आढळून आले. तर ११२ रूग्णांचा मृत्यू झाल्याची नोंद झाली आहे. राज्यात आतापर्यंत ५३ हजार ९०७ रूग्णांचा मृत्यू झालेला आहे. राज्यातील मृत्यू दर २.४ टक्के आहे. राज्यात सध्या २ लाख ८२ हजार ४५१ अॅक्टिव्ह केसेस आहेत.

तसेच, आज दिवसभरात १७ हजार १९ जण करोनातून बरे झाल्याने त्यांना डिस्चार्ज देखील मिळाला. आतापर्यंत राज्यात २३,००,०५६ जण करोनातून बरे झाले आहेत. राज्यातील रूग्ण बरे होण्याचे प्रमाण (रिकव्हरी रेट) ८७.२ टक्के आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER