राज्यात दिवसभरात ३४ हजार ४४८ नवे रुग्ण; ५९ हजार ७३ रुग्णांना डिस्चार्ज

Coronavirus Maharashtra

मुंबई : राज्यात कोरोना (Corona) रुग्णवाढीचा आकडा दिवसेंदिवस वाढत आहे. मात्र आज राज्याला मोठा दिलासा मिळाला आहे. महाराष्ट्रात कोरोना रुग्णवाढीला ब्रेक लागला असल्याने दिलासा मिळत आहे. दुसरीकडे मात्र मृतांच्या आकडेवारीने सर्वांचीच चिंता वाढवली आहे. कारण, राज्यात महिनाभरात तब्बल २१ हजार ६५८ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. महिनाभरात इतक्या मोठ्या संख्येत कोरोनाबाधितांचा मृत्यू झाल्याने राज्य सरकारच्या चिंतेत आणखी भर पडली आहे.

आज राज्यात ५९,०७३ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. राज्यात आजपर्यंत एकूण ४७,६७,०५३ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. यामुळे रुग्ण बरे होण्याचे प्रमाण हे ८९.२ टक्के इतके झाले आहे. आज राज्यात ३४,८४८ नवीन रुग्णांचे निदान झाले आहे. सध्या राज्यात ४,९४,०३२ सक्रिय रुग्ण आहेत. आज राज्यात ९६० कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. ९६० मृतांपैकी ३७१ मृत्यू हे मागील ४८ तासांतील तर १८८ मृत्यू हे मागील आठवड्यातील आहेत. उर्वरित ४०१ मृत्यू हे एक आठवड्यापेक्षा अधिक कालावधीपूर्वीच आहेत. राज्यातील सध्याचा मृत्युदर १.५१ टक्के इतका आहे.

Disclaimer : बातमीत एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. महाराष्ट्र टुडेच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व महाराष्ट्र टुडे स्वीकारत नाही.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button