संकटकाळात मनसेने करून दाखवलं; तब्बल १८०० हून अधिक रक्त पिशव्यांचं संकलन

MNS - Maharashtra today

पुणे :- देशात सध्या कोरोनाच्या (Corona) दुसऱ्या लाटेमुळे मोठा हाहाकार माजला आहे. सर्वत्र औषधी आणि ऑक्सिजनचा तुटवडा निर्माण झाला असताना आता रक्ताचीही गरज भासत आहे. काही रुग्णांना रक्ताची गरज भासू लागली आहे. रक्तपेढ्यात पुरेसा साठा नसल्याने रुग्णांच्या नातेवाइकांना वणवण भटकावे लागत आहे. राज्य सरकारनेही रक्तदान करण्याचे जनतेला आवाहन केले आहे. अशातच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने (MNS) रक्तदान शिबिरांचे आयोजन करून एकाच दिवशी तब्बल १८०० हून अधिक रक्त पिशव्यांचे  संकलन केले.

पुण्यात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने एकामागोमाग एक रक्तदान शिबिरांची मोहीम राबवली. ह्या शिबिरांमधून १८०० हून अधिक रक्त पिशव्यांचं संकलन करण्यात आलं. अशा संकटसमयी मनसेने राबवलेल्या उपक्रमाचं सर्वत्र कौतुक होत आहे.

Disclaimer:-बातमीत एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. महाराष्ट्र टुडेच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व महाराष्ट्र टुडे स्वीकारत नाही.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button