दिल्ली हिंसाचारादरम्यान आप नगरसेवकाच्या घरात सापडल्या बंदुका, पेट्रोल बॉम्ब आणि दगडांचा ढीग

नवी दिल्ली :- आम आदमी पक्षाचे नगरसेवक ताहिर हुसैन यांच्या घरातून पेट्रोल बॉम्ब, बंदुका, मोठ मोठे दगड, बॅचकी जप्त करण्यात आले आहेत. त्यामुळे उत्तर-पूर्व दिल्लीतील खजुरी येथे हिंसाचार भडवण्यामागे आम आदमी पक्षाचे नगरसेवक ताहिर हुसैन यांचा हात होता का? असा प्रश्न निर्माण झाला आहे. आम आदमी पार्टीचे नगरसेवक ताहिर यांनी सर्व आरोप फेटाळले आहेत. यासाठी पार्टीदेखील ताहिर हुसैन यांच्या बचावासाठी समोर आली आहे. या प्रकरणात निष्पक्ष तपासाची मागणी करीत  आहे. त्यांच्या घराचा एक व्हिडीओ समोर आला होता. ज्यामध्ये या घरातून सतत दगडफेक व पेट्रोल बॉम्ब येत होते. गुप्तचर विभागाचे सहकारी अंकित शर्मा यांच्या हत्येसाठी या घराच्या छतावर असलेल्या लोकांना शर्मा यांच्या कुटुंबीयांनी जबाबदार ठरविले आहे.

अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांनाही मिळणार कर्जमाफीचा लाभ : अजित पवार

जेव्हा काही माध्यमांचे प्रतिनिधी आप नगरसेवकाच्या घरावर गेले तेव्हा त्यांना छतावर दगडांचा ढीग दिसला. तिथे दगडांची खडीदेखील होती. जसे काही मोठ्या दगडांना तोडून त्याचे लहान लहान तुकडे करण्यात आले असावे. सोबतच तेथे एक मोठी बॅचकीदेखील पडलेली होती. याशिवाय शीतपेयांच्या बाटल्यांमध्ये पेट्रोल भरलेले होते. ज्यावर कपडा लावून बॉम्ब बनविण्याचा प्रयत्न केला असावा अशी शक्यता वाटावी. याशिवाय अनेक गोण्यांमध्ये दगड भरलेले होते. या प्रकरणात ताहिरने सर्व आरोप फेटाळले आहेत. त्यांनी म्हटले आहे की, हिंसाचारादरम्यान ते घरात नव्हते. त्यामुळे माझ्या घरावरून कोण बॉम्ब फेकत होते, याबद्दल मला माहिती नसल्याचे त्यांनी सांगितले.