विठ्ठलाची शासकीय पूजा इंग्रजांच्या काळातही व्हायची

Pandharpur wari

शुक्रवारी पहाटे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते सपत्नीक विठ्ठलाची शासकीय महापूजा करण्यात आली. लातूरच्या शेतकरी दांपत्याला महापूजेचा मान मिळाला. विठ्ठलाच्या शासकीय पूजेची ही परंपरा खूप जुनी आहे. ब्रिटिशांच्या राजवटीतही विठ्ठलाची शासकीय पूजा होत होती. भारतावर साधारण दीडशे वर्षे इंग्रजांचे राज्य होते. या काळातही पंढरपूरची वारी विनाखंड सुरूच होती.


पंढरपूर :  शुक्रवारी पहाटे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते सपत्नीक विठ्ठलाची शासकीय महापूजा करण्यात आली. लातूरच्या शेतकरी दांपत्याला महापूजेचा मान मिळाला. विठ्ठलाच्या शासकीय पूजेची ही परंपरा खूप जुनी आहे. ब्रिटिशांच्या राजवटीतही विठ्ठलाची शासकीय पूजा होत होती. भारतावर साधारण दीडशे वर्षे इंग्रजांचे राज्य होते. या काळातही पंढरपूरची वारी विनाखंड सुरूच होती.

ही बातमी पण वाचा :- विठ्ठलरुपी जनतेची सेवा करण्यासाठी पाच वर्षांची पुन्हा संधी मिळेल हीच अपेक्षा – मुख्यमंत्री

इंग्रज हिंदू नसल्यामुळे ही पूजा करत नव्हते. त्यांनी नेमलेले प्रांत अधिकारी, जिल्हाधिकारी (कलेक्टर) किंवा त्यापेक्षा मोठा अधिकारी ही पूजा करत होते. इंग्रजांनी या पूजेला कधीही विरोध केला नाही. शासकीय पूजेनंतर मंदिराला देणगी देण्याची प्रथा त्यावेळीही होती. इंग्रज दोन  हजार रुपये देणगी देत होते. आजही पूजेनंतर मुख्यमंत्री सरकारी निधीतून ही देणगी देत असतात. मुख्यमंत्र्यांनी पूजा कधी करायची हे मनोहर जोशी मुख्यमंत्री असताना ठरले. आषाढीची पूजा मुख्यमंत्र्यांनी आणि कार्तिकीची पूजा उपमुख्यमंत्र्यांनी करण्याचे ठरले. या पूजेला दोन ते अडीच  तास लागतात. एवढा वेळ का लागतो आणि पूजेसाठी दोन मंत्र्यांची गरज काय, असा प्रश्न त्यांनी उपस्थित करत हा निर्णय घेतला.

ही बातमी पण वाचा : ‘बा विठ्ठला… चांगला पाऊस पडूदे…’- मुख्यमंत्र्यांचे विठ्ठलाच्या चरणी साकडे

ही बातमी पण वाचा:- पाताळ भुवनेश्वर गुहेत आहे सृष्टीच्या निर्मितीपासून अंताची माहिती!