अभिमन्यू काळेंच्या बदलीवरून महाविकास आघाडीमधील वाद चव्हाट्यावर ? काँग्रेस नेत्यांमध्ये नाराजीचा सूर

Maharashtra Today

मुंबई : एफडीए कमिशनर पदावरून उचलबांगडी झालेले अभिमन्यू काळे यांच्या बदलीवरून महाविकास आघाडीत वादंग पेटले आहे . भाजपला (BJP) रेमडेसीवीर इंजेक्शनचा साठा पुरवणाऱ्या ब्रुक फार्मा संचालकाला चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले होते. अखेर या प्रकरणी राज्य सरकारने कारवाईचे संकेत दिले आहे. एफडीएचे आयुक्त अभिमन्यू काळे (Abhimanyu Kale) यांच्यावर कारवाई करण्यात आली .

अभिमन्यू काळे यांची बदली राष्ट्रवादीच्या नेत्यांच्या दबावामुळे केली गेल्याच्या चर्चा रंगल्या आहेत , पण त्यावरून काँग्रेस नेते नाराज आहेत. काळे यांची बदली तात्काळ करणे योग्य नाही, असा सूर काँग्रेस पक्षातील काही वरिष्ठ मंत्र्यांचा असल्याची माहिती आहे. आयएएस अधिकाऱ्यांवर अशाप्रकारे अरेरावी भूमिका करणे योग्य नाही त्याचप्रमाणे काळे यांची बदली ही तात्काळ करणे योग्य नाही असा काँग्रेस मंत्र्याचा सूर पाहायला मिळतो आहे. त्यामुळे काळे यांच्या बदलीवरून आघाडीमध्ये बिघाडी झाली आहे का, असा सवाल उपस्थित केला जात आहे.

 

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button