उद्धव ठाकरेंमुळे राणेंना १५ वर्षांत अनेक पक्ष सोडावे लागले त्यामुळे राग स्वाभाविकच – शिवसेना

Vaibhav NAik & Naryane Rane

मुंबई : दसरा मेळाव्यात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी विरोधकांना चांगलेच फैलावर घेतले.  त्यातच सतत टीका करणा-या राणेंवरही उद्धव ठाकरे यांनी टीकेची तोफ डागली होती. त्यावर नारायण राणे (Narayan Rane) यांनीही दुस-या दिवशी प्रत्युत्तर दिले. हे प्रकरण एवढ्यावरच थांबले नाही तर, आता यात शिवसेना नेते वैभव नाईक (Vaibhav Naik) यांनी उडी घेतली आहे. नाईक यांनी नारायण राणेंच्या वक्तव्याचा समाचार घेतला आहे. गेल्या १५ वर्षांत राणेंनी उद्धव ठाकरेंवर अनेकदा टीका केली; पण उद्धव ठाकरेंसाठी राणे हा संपलेला विषय असल्यामुळे त्यांनी या १५ वर्षांत कधीही राणेंचे नाव घेऊन टीका केली नाही.

“उद्धव ठाकरेंमुळे राणेंना गेल्या १५ वर्षांत स्वतःच्या पक्षासह अनेक पक्ष विसर्जित करावे लागले. पक्ष सोडावे लागले.  त्यामुळे राणेंचा उद्धव ठाकरेंवर राग असणे स्वाभाविक आहे. ” असं वैभव नाईक म्हणाले. दसरा मेळावा ही शिवसेनेची परंपरा आहे. दरवर्षीच्या दसरा मेळाव्याला शिवसेना पक्षप्रमुख महाराष्ट्राला मार्गदर्शन करतात. उद्धव ठाकरे केंद्र सरकारबद्दल बोलले. मराठा, धनगर आरक्षणाबद्दल बोलले होते.

दसरा मेळाव्यातील भाषणात ही उद्धव ठाकरेंनी राणेंचे नाव घेतले नाही. परंतु, त्यांनी दिलेलं एक उदाहरण राणेंना चपखल बसल्यामुळे त्यांचा संताप झाला. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांचा एकेरी भाषेत उच्चार करून राणेंनी असंस्कृतपणा दाखवून दिला आहे. राज्याचे पर्यटनमंत्री आदित्य ठाकरेंसारख्या सुसंस्कृत तरुणावर राणेंनी आरोप करणे चुकीचे आहे. राणेंच्या दोन मुलांमुळे राणेंवर काय परिस्थिती ओढवली हे राज्यातील साऱ्या जनतेनं  पाहिलं आहे.

राणे आणि त्यांच्या दोन्ही मुलांनी शिवसेनेला आव्हान देण्याच्या  गोष्टी करू नये; कारण त्यांच्या आव्हानामध्ये काही दम राहिलेला नाही. नारायण राणेंनी मुख्यमंत्र्यांवर केलेली टीका त्यांची वैचारिक दिवाळखोरी दर्शवते, अशी टीका वैभव नाईक यांनी केली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER